महाराष्ट्र

रावेरमध्‍ये खळबळ..येथूनही सात हजार रूपयांच्‍या नकली नोटा चलनात

रावेरमध्‍ये खळबळ..येथूनही सात हजार रूपयांच्‍या नकली नोटा चलनात

साम टिव्ही ब्युरो

रावेर (जळगाव) : अपेक्षेप्रमाणे रावेर शहरात देखील नकली नोटा चलनात आणणारे रॅकेट सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात मध्यरात्री पाच जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून त्यातील चौघांना अटक करण्यात आली आहे. यामुळे शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शहर आणि परिसरात किती प्रमाणात बोगस नोटांचा वापर करण्यात आला याबाबत चर्चा सुरू आहे. (jalgaon-news-raver-police-arrested-duplicate-currency-in-market-use)

याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सचिन रघुनाथ घुगे यांनी दिली आहे. संशयित आरोपी असलम उर्फ राजू सुपडू तडवी (वय ३०, रा. पाच बीबी टेकडी रावेर), सोनू मदन हरदे (वय ३०, रा अफुल्ली रावेर), रविंद्र राजाराम प्रजापति (वय ३१, रा. कुंभार वाडा, रावेर), शेख शाकीर शेख साबीर (वय २६, रा. खाटीक वाडा, रावेर), शेख शकीर शेख हाफिज (रा. मदिना कॉलनी, रावेर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. १०० व २०० रुपयांच्या नकली, बनावट भारतीय चलनी नोटा रावेर शहरात आणून त्या संशयित आरोपी शेख शकीर शेख हाफिज याने अन्य चार संशयित आरोपींना चलनात आणण्यासाठी दिल्या. त्या नोटा नकली असल्याचे माहिती असूनही चौघांनी त्यातील काही नोटा चलनात आणून खर्च केल्या आहेत. पोलिसांनी चौघांच्या घेतलेल्या अंगझडतीत ७ हजार रुपयांच्या नकली नोटा मिळून आल्या आहेत. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे हे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत.

चौघांना रात्री अटक

या प्रकरणी शेख शकीर शेख हाफिज यास मध्यप्रदेश पोलिसांनी यापूर्वीच अटक करून नेले असून अन्य चौघांना रावेर पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. या नकली नोटा चलनात आणण्याच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार येथील मदिना कॉलनीतील शेख शकीर शेख हाफिज हा अवघ्या १९ वर्षांचा युवक असून इतक्या मोठ्या प्रमाणावर नकली नोटा त्याने कोठून आणल्या? किती रुपयांच्या नकली नोटा आतापर्यंत त्याने चलनात आणल्या याचा कसून तपास होण्याची गरज आहे. नकली नोटांचे हे रॅकेट महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात सक्रिय असून आधी याबाबत मध्यप्रदेशातील छिपाबड पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मध्यप्रदेश पोलिसांनी याबाबत येथे शेख शकीर याला अटक करण्यासाठी आले असतांना कमालीची गोपनीयता पाळली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election 2025 : अख्खा गेम फिरणार? १०७ जागा निकाल बदलणार, कारण....

Tilgul Ladoo Benefits: थंडीत रोज एक तिळगूळ लाडू खा, कॅल्शियम वाढेल अन् हाडं होतील मजबूत

Indurikar Maharaj: 'मला बोला, माझ्या मुलीचा काय दोष?' ग्यान देणारे इंदोरीकर कीर्तन सोडणार?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी पात्रता काय? कोण करु शकणार? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Maharashtra Live News Update: नवले ब्रीज अपघात प्रकरणी मुरलीधर मोहोळ घटनास्थळी पाहणी करणार

SCROLL FOR NEXT