Kidnaping Saam tv
महाराष्ट्र

भावाला धक्‍का देत मुलीला नेले पळवून

भावाला धक्‍का देत मुलीला नेले पळवून

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : यावल तालुक्यातील भावाला धक्का देत सोबत असलेल्‍या मुलीला दोन जणांनी दुचाकीवरून पळवून नेले. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon news push the boy and girl kidnaping two boys)

यावल (Yawal) तालुक्यातील एका गावात मुलगी कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. फैजपूर (Faizpur) येथे खंडोबा यात्रेच्या निमित्ताने मुलगी व तिचा भाऊ आणि नातेवाईक रविवारी (२० मार्च) दुपारी आले होते. दुपारी पिडीत मुलीसह तिचा भाऊ आणि नातेवाईक घरी जात होते.

धक्‍का देत दिली धमकी

दरम्‍यान मुलगी घरी जात असताना जीवन अशोक भालेराव (रा. भालोद ता. यावल) आणि आकाश संजय भागेश्वर (रा. सावदा ता. रावेर) हे दुचाकीवर आले. दोघांनी पीडीत मुलीच्या भावाला व नातेवाईकाला धक्का दिला व मुलीला दुचाकीवर बसवून पसार झाले. या फिर्यादी दोघांनी लागलीच फैजपूर पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी जीवन भालेराव आणि आकाश भागेश्वर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

SCROLL FOR NEXT