बोअरवेल 
महाराष्ट्र

बोअरवेलमध्ये कुत्र्याचे पिल्‍लू; तिसऱ्या प्रयत्‍नात सुखरूप काढले बाहेर

बोअरवेलमध्ये कुत्र्याचे पिल्‍लू; तिसऱ्या प्रयत्‍नात सुखरूप काढले बाहेर

संजय महाजन

जळगाव : खेळता खेळता बोअरवेलच्‍या खड्ड्यात बालक पडले व त्‍यास सुखरूप बाहेर काढल्‍याच्‍या घटना एकल्‍या व पाहिल्‍या आहेत. त्‍यानुसारच दीड ते दोन महिन्‍याचे कुत्र्याचे पिल्‍लू बोअरवेलमध्‍ये पडले; त्‍यास सुखरूप काढण्यात यश मिळाले. (jalgaon-news-Puppies-in-borewells-Safely-pulled-out-in-the-third-attempt)

जळगाव शहरातील गणपतीनगरमधील बंद असलेल्या तारा अपार्टमेंटच्या बोअरवेलमध्ये साधारण दोन महिने वयाचे कुत्र्याचे पिल्लू पडले होते. आतून त्‍या पिल्‍लाचा आवाज येत असल्‍याने नागरिकांनी त्‍यास काढण्याचा प्रयत्‍न केला. दोन वेळा प्रयत्न केला परंतु तो अयशस्‍व झाला. त्यांनी जळगाव महापालिका अग्निशमन दलाला फोन करत सदर प्रकाराची माहिती दिली.

दोन वेळा अयशस्‍वी परंतु..

नागरिकांच्या निरोपाला प्रतिसाद देत अग्निशमन दलाचे पथक लागलीच पोहचले. यानंतर दोर व हुकच्या सहाय्याने पिल्‍लाला काढायला सुरवात केली. अग्निशमन दलाचे दोन प्रयत्न देखील अयशस्‍वी राहिले. मात्र तिसऱ्या वेळी त्या पिलाला सुखरूप बाहेर काढले. जळगाव महापालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रदीप धनगर, प्रकाश चव्हाण, भगवान जाधव, नितीन बारी या कर्मचाऱ्यांनी ही बचाव मोहीम यशस्वी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime News: मुंबईतून मुलांना कोण करतंय गायब? 36 दिवसांत 82 मुलं बेपत्ता

KDMC News: बेकायदेशीर उपायुक्त पदावरून संजय जाधव यांची हकालपट्टी, कल्याण डोंबिवली महापालिकेत खळबळ

सावधान! बिबट्यामुळे होणार रेबीज? तज्ज्ञांचं स्पष्ट मत

Mumbai Police: आनंदाची बातमी! कमी किंमतीत हक्काची घरं; पोलिसांच्या घरांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

भाजपमधील आयाराम महापालिकेत गॅसवर, भाजपच्या खेळीनं इच्छूक हवालदिल

SCROLL FOR NEXT