प्रपोज डे saam tv
महाराष्ट्र

‘प्रपोज डे’ला केला प्रपोज; नकार मिळाल्‍याने तरुणीसमोरच कापली नस

‘प्रपोज डे’ला केला प्रपोज; नकार मिळाल्‍याने तरुणीसमोरच कापली नस

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : व्‍हॅलेंटाईन विक सध्‍या सुरू आहे. या आठवड्यात तरुण– तरुणी प्रत्‍येक दिवस साजरा करत असतात. त्‍यानुसार ‘प्रपोज डे’चे (Propose Day) औचित्‍य साधून एका तरुणाने तरुणीला प्रपोज केला. परंतु, नकार मिळाल्‍याने तरुणाने नस कापून घेतल्याचा प्रकार घडला. (jalgaon Proposed to Propose Day Rejection did not cut it in front of the young woman)

शहरातील एका तरुणाने प्रेमभंग झाल्याने भर मार्केटमध्‍येच तरुणीसमोर आपल्या हाताची नस कापून घेतल्याची घटना घडली. यामुळे मार्केट (Jalgaon News) परिसरात चांगलाच खळबळ उडाली होती. सदर प्रकार लक्षात येताच काही लोकांनी रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (Jalgaon Medical Collage) दाखल केले.

तरुणीही होती मार्केटमध्‍ये

शहरातील एका तरुणाचे तरुणीवर प्रेम (Love) होते. तिला प्रपोज केले असता तिच्‍याकडून नकार मिळाला. त्यामुळे नाराज तरुणाने फुले मार्केटमध्ये ब्लेडने स्वत:च्या हाताची नस कापली. यावेळी ती तरुणी देखील समोर उभी होती. तिच्याकडे पाहात असतानाच त्याने नस कापल्यामुळे या तरुणीला चांगलाच धक्का बसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: प्रकाश महाजन करणार शिवसेनेत प्रवेश

Todays Horoscope: आजच्या दिवशी कोणाच्याही मदतीची अपेक्षा करू नका, वाचा राशीभविष्य

नांदेड हादरलं! कुटुंबातील चौघांचा मृत्यू; २ तरुण्याबांड पोरांची रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या, घरी आई-बापानं जीवन संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Bangladesh: बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, बेदम मारहाण करून जीव घेतला

Pune Corporation Election: जागा वाटपावरून महायुतीचं बिनसलं, शिवसेना युतीमधून बाहेर पडणार? शिंदे गटाचा अल्टिमेटम

SCROLL FOR NEXT