jalgaon
jalgaon saam tv
महाराष्ट्र

चिमुकलीच्‍या धाडसाचा गौरव; जळगावच्‍या शिवांगीला प्रधानमंत्री बालशक्‍ती पुरस्‍कार

Rajesh Sonwane

जळगाव : आईला विजेचा धक्का लागला असतांना प्रसंगावधान राखून मोठे धाडस करत साडेसहा वर्षीय चिमुकल्‍या मुलीने आईचे प्राण वाचविले. तिच्‍या या हिंमतीची दखल म्‍हणून आज प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्काराने (PM Bal Shakti Award) गौरविण्यात आले. (jalgaon news Prime Minister Bal Shakti Award to Shivangi kale of Jalgaon)

जळगावातील (Jalgaon) शिवांगी काळे असे या चिमुकलीचे नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते देशातील बाल शौर्य विजेत्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आले. कोरोना संसर्गामुळे हा कार्यक्रम ऑनलाईन घेण्यात आला. यात शिवांगी काळे या साडेसहा वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे. आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Collector Abhijit Raut) यांच्यासह शिवांगी आणि तिच्या पालकांनी पंतप्रधानांशी संवाद साधला.

तिने राखले प्रसांगवधान

साधारण वर्षभरापुर्वी म्‍हणजे ५ जानेवारी २०२१ रोजी घटना घडली. त्‍यावेळी शिवांगी ही पाच वर्षाची होती. शिवांगीची आई घरात बाथरूममध्ये असतांना त्यांना हिटरचा शॉक लागला. यानंतर त्‍या जोराने ओरडल्‍या. घरात शिवांगी ही तिच्‍या दोन वर्षाच्या लहान बहिणीसह होती. या दोन्ही बहिणी आईची अवस्था पाहून घाबरल्या. मात्र शिवांगीने प्रसंगावधान राखून आईला स्पर्श न करता हिटरचे स्वीच बंद केले. यातून तिने आईचे प्राण तर वाचवलेच. पण ती आणि तिच्या बहिणीलादेखील दुर्घटनेपासून वाचविले. यामुळे आज तिला प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यातील लार्गो पिझ्झा हॉटेल आग

Astro Tips: संध्याकाळी या वेळी लावा दिवा, लक्ष्मी येईल घरात

Mumbai News : ठाकरे गटाला भाजप उमेदवाराच्या कार्यलयाबाहेरील राडा भोवला, मुलुंडमधील 5 शिवसैनिकांना अटक

Krishi Seva Kendra: तीन कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द, नगरमध्ये खळबळ

Hingoli News: वय उलटूनही लग्न जमेना, नैराश्यातून तरुणाने संपवलं जीवन; हिंगोलीतील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT