Mahavitaran Saam tv
महाराष्ट्र

थकबाकी न भरणाऱ्या कोविड रुग्णालयांचा वीजपुरवठा होणार खंडित

थकबाकी न भरणाऱ्या कोविड रुग्णालयांचा वीजपुरवठा होणार खंडित

Rajesh Sonwane

जळगाव : खानदेशातील विविध कोविड रुग्णालयांकडे ८ कोटी ३७ लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. महावितरणने वारंवार पाठपुरावा करूनही या रुग्णालयांनी थकबाकी भरलेली नाही. त्यामुळे आता नाईलाजास्तव या रुग्णालयांचा (Hospital) वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय नसल्याचे महावितरणने म्हटले आहे. (jalgaon news Power supply to covid hospitals will be cut off due to non payment of arrears)

कोविड (Covid) संकटात महावितरणने नागरिकांसह सर्व रुग्णालये व अत्यावश्यक सेवांना अखंडित वीजपुरवठा केला. यात कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या शासकीय व खासगी रुग्णालयांचाही समावेश आहे. तेथे वीजपुरवठा खंडित होणार नाही; याची महावितरणने (MSEDCL) पूर्णपणे काळजी घेतली. त्यामुळे वीजपुरवठा खंडित न करता थकबाकी भरण्यासाठी संबंधित रुग्णालयांच्या प्रशासनाकडे महावितरण वारंवार पाठपुरावा करत आहे. मात्र रुग्णालयांनी बिलांची थकबाकी भरलेली नाही.

अशी आहे थकित रक्‍कम

जळगाव (Jalgaon) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील दोन वीज जोडण्यांची १ कोटी ८४ लाख ६४ हजार २४४ रुपये थकबाकी आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे १० लाख ६९ हजार ११३ रुपयांचे वीजबिल थकीत आहे. गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाकडे तब्बल ५ कोटी २२ लाख ७९ हजार ६३४ रुपयांचे वीजबिल थकीत आहे. धुळे (Dhule) येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाकडे ५३ लाख २९ हजार ९८९ रुपये तर शिरपूर येथील शासकीय रुग्णालयाकडे १५ लाख ४९ हजार ७९५ रुपये वीजबिल थकले आहे. नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे ५१ लाख ३ हजार १४२ रुपये वीजबिल थकीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mallika Sherawat : मल्लिका शेरावत 'बिग बॉस 19'मध्ये सहभागी होणार का? स्वतःच केला खुलासा

Maharashtra Live News Update : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या घरी ईडीची धाड; १२ ठिकाणी छापेमारी

ऑफिसमध्ये घुसला अन् अंदाधुंद गोळीबार, स्वत:वरही झाडल्या गोळ्या, ५ जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics: रेव्ह पार्टीचा खरा सूत्रधार कोण? ठाकरेंनी अग्रलेखात थेट 'या' भाजप नेत्याचं नाव घेतलं

Maharashtra Rain Update : हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 5 दिवसात राज्यात पावसाचा जोर ओसरणार! | VIDEO

SCROLL FOR NEXT