Gulabrao patil pankaja munde 
महाराष्ट्र

पंकजा मुंडे शिवसेनेत आल्‍या तर सन्‍मानच : गुलाबराव पाटील

संजय महाजन

जळगाव : मुंडे परिवाराचे काम आभाळा ऐवढे मोठे काम आहे. यामुळे त्‍यांच्‍या वारसदाराला कुठेतरी न्‍याय, सन्‍मान मिळेल अशी समाजाची अपेक्षा आहे. यामुळे पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्‍या तर त्‍यांचे स्‍वागत राहिल; त्‍यांना येथे स्‍थान व सन्‍मान मिळेल; असे मत राज्‍याचे पाणी पुरवठ मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे मांडले. (jalgaon-news-political-news-gulabrao-patil-statment-pankaja-munde-shiv-sena-entry)

भाजपच्‍या नेत्‍या पंकजा मुंडे यांच्‍या समर्थकांनी त्‍यांनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी मागणी केली आहे. तसा सोशल मिडीया वॉर देखील समर्थकांकडून चालविला जात आहे. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्‍हणाले, की विधानसभा निवडणूकीनंतर पंकजा मुंडे यांना हवे तसे प्रतिनिधीत्‍व मिळाले नाही. मुळात गोपीनाथ मुंडे यांनी भाजपसाठी पडतीच्‍या काळात खुप मोठे काम केले आहे. आता मात्र त्‍यांच्‍या कन्‍या पंकजा मुंडे यांना संघर्ष करावा लागत आहे. नाथाभाऊ, चंद्रशेखर बावनकुळे व पंकजा मुंडे यांना तिकिट दिले नव्‍हते. याचाच अर्थ ओबीसी समाजाचे कुठेतरी खच्‍चीकरण केले जात असल्‍याचे देखील पाटील म्‍हणाले.

ती समाजाची अपेक्षा

गोपीनाथ मुंडे व मुंडे परिवाराचे काम मोठे आहे. यामुळे मुंडेंचा वारसदार म्‍हणून पंकजा मुंडे यांना योग्‍य स्‍थान व प्रतिनिधीत्‍व शिवसेनेत मिळेल; अशी समाजाची अपेक्षा आहे. यामुळे पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्‍यांचे स्‍वागतच राहिल. प्रवेश केल्‍यानंतर त्‍यांना पद काय द्यायचे हे मुख्‍यमंत्री तथा शिवसेना अध्‍यक्ष उद्धव ठाकरे ठरवतील; असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indurikar Maharaj Kirtan: 'स्वार्थासाठी धर्माचे भांडवल करू नका, गरिबांच्या पोरांचा बळी घेऊ नका', इंदुरीकर महाराजांनी नेत्यांना फटकारले

Maharashtra Politics : अजितदादांचं ठरलं! ७० हून अधिक जागांवर दावा, विद्यमान आमदारांनाही मोठा दिलासा!

Shukraditya Rajyog: सूर्य-शुक्राच्या युती बनला शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींच्या सर्व इच्छा होणार पूर्ण

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT