Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: गावाला दरवर्षी पाण्याचा वेढा; विद्यार्थ्यांची पडतेय शाळेला दांडी

गावाला दरवर्षी पाण्याचा वेढा; विद्यार्थ्यांची पडतेय शाळेला दांडी

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : बोरी नदीच्‍या काठावर असलेल्‍या पिंप्री गावाला दोन्ही बाजूंनी पाण्याचा वेढा पडला आहे. ग्रामस्‍थांसाठी ही समस्‍या दरवर्षीची आहे. मुळात (Jalgaon) पिंप्री ते मोंढाळे मार्गावर पुलाची मागणी करूनही प्रश्न मार्गी लागलेला नाही. यंदा तर मागील २२ दिवसांपासून वेढा असल्‍याने विद्यार्थी (Student) देखील शाळेत जावू शकत नसल्‍याचे वास्‍तव आहे. (Jalgaon News Bori River)

पिंप्री गावाला एका बाजूने बोरी नदी (Bori River) तर दुसऱ्या बाजूने नाला आहे. नाला व नदीला पाणी असल्याने गावाला पाण्याचा वेढा पडला आहे. गावाच्या डाव्या व उजव्या अशा दोन्ही बाजूला केटीवेअर बंधारे आहेत. पिंप्रीच्या बाजूला हाकेच्या अंतरावर मोंढाळे गाव आहे. तर बोरी नदीला वर्षभर पाणी राहत असल्याने तसेच गावालगतच्या बोरी नदीवरील दोन केटीवेअर वर्षभर भरलेले असल्याने नागरिकांना ये- जा करता येत नाही. त्यामुळे मोंढाळे जाण्यासाठी पिंप्रीच्या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना पिंप्रीहून टोळी व टोळीहून मोंढाळे जावे लागते.

पुल उभारणीची मागणी

पिंप्री ते मोंढाळे या बोरी नदीवर पुल उभारणी मागणी तसेच पिंप्री ते टोळी या रस्त्याची शासनाकडे वेळोवेळी मागणी केली केली आहे. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. पारोळा शहरापासून ७ किलोमीटर अंतर असलेल्या गावाला आता पाण्यामुळे १४ किलोमीटरचा रस्ता पार करुन जावे लागते. यामुळे विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर प्रवाशांना पायपीट करावी लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Different Types of Bras: डेली वेअरसाठी Comfortable आणि फॅशनेबल ब्रा; महिला व मुलींसाठी ठरतील बेस्ट

Pune: पुण्यात राजकारण तापले, धंगेकरांच्या विरोधात सेवानिवृत्त पोलिस अधिकारी रिंगणात, कोणत्या पक्षाकडून मिळणार उमेदवारी?

SSC-HSC : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय, आताच वाचा

Dhurandhar: 'धुरंधर' मधील रहमान डकैतचा भाऊ उजैर बलोचची भूमिका साकारणारा अभिनेता कोण?

Maharashtra Live News Update: राज ठाकरेंच्या भेटीला संजय राऊत, मनपा निवडणुकीवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT