चाळीसगाव (जळगाव) : घरात गॅसगळतीमुळे लागलेल्या आगीत दागदागिन्यांसह साडेसात लाखांची रक्कम जळून खाक झाल्याची घटना पोहरे येथे घडली होती. यात तीन लाखांहून अधिक नोटा या अर्धवट जळालेल्या होत्या. या जळालेल्या नोटा बदलण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी स्वतः मुंबई - नागपूर (Nagpur) रिझर्व्ह बॅंकेच्या तब्बल पाच महिने फेऱ्या मारल्या. त्यानंतर ही रक्कम संबंधित कुटुंबीयांना बदलून मिळाली. (Jalgaon Chalisgaon News MLA Mangesh Patil)
चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील पोहरे येथील शेतकरी (Farmer) केशव राघो माळी महाजन यांच्या घरात अचानक गॅस गळती झाल्यामुळे आग लागल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या आगीत दागिन्यांसह साडेसात लाखांहून अधिक रोकड मुद्देमाल जळून खाक झाला होता. त्यापैकी ३ लाख रुपयांच्या नोटा या अर्धवट जळाल्या होत्या. महाजन यांनी एकेक रुपया आपल्या घामातून, कष्टातून कमावले होते. मात्र या घटनेने क्षणार्धात होत्याचे नव्हते केले.
रक्कम जमा झाल्याची नव्हती कल्पना
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आमदार चव्हाण यांनी २८ फेब्रुवारीला महाजन यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली व झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नुकसान पाहून व ग्रामस्थांनी मांडलेल्या व्यथा ऐकून आमदार मंगेश चव्हाण यांचे मन हळहळले. याच वेळी आमदार चव्हाण यांनी आगीत अर्धवट जळालेल्या नोटा स्वतः रिझर्व्ह बँकेतून बदलवून आणेल, असे आश्वासन देऊन त्या नोटा ताब्यात घेतल्या होत्या. त्यानंतर आमदार चव्हाण यांनी जळालेल्या नोटा बदलून आणण्यासाठी मुंबई - नागपूर रिझर्व्ह बँकेच्या चकरा मारल्या. आमदार चव्हाण यांनी आपल्या कार्यालयामार्फत कागदासह प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सातत्याने ते पाठपुरावा करीत राहिले. तब्बल पाच महिन्याच्या पाठपुराव्यानंतर त्यांना यश आले आहे. नुकतीच पोहरे येथील शेतकरी केशव राघो माळी यांच्या खात्यात रिझर्व्ह बँकेतर्फे तीन लाख रुपये वर्ग केले आहे. याबाबत त्यांना कल्पना नसल्याने आमदार चव्हाण यांच्या कार्यालयातून पैसे आल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली. तेव्हा पैसे खात्यात जमा झाल्याचे दिसून आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.