गिरणा नदी
गिरणा नदी 
महाराष्ट्र

गिरणा नदीत बुडून युवकाचा मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

नांद्रा (जळगाव) : नांद्रा (ता. पाचोरा) येथील सतरा वर्षीय शाळकरी मुलाचा माहेजी येथील गिरणा नदीपात्रात पोहताना बुडून मृत्यू झाला. हर्षल संजय तावडे असे मृत मुलाचे नाव असून, रविवारी (ता. २) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. (jalgaon news pachora Youth dies after drowning in Girna river)

हर्षल काही मित्रांसोबत माहेजी येथील गिरणा नदीपात्रात (Girna River) पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे डोहात बुडून त्याचा मृत्यू झाला. हनुमंतखेडा येथील नावेकरींनी शोध घेऊन त्याला बाहेर काढले. परंतु तोपर्यंत फार उशीर झाला होता. हर्षलने दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर जळगाव (Jalgaon) येथे बबनभाऊ बाहेती महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतला होता. शाळकरी मुलांचा अशा दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. हर्षल हा अभ्यासात अत्यंत हुशार होता.

नववर्षाच्‍या सुरवातीलाच कुटुंबावर शोककळा

नांद्रा येथील संजय अवचित तावडे यांना दोन मुले होती. हर्षल हा लहान होता. वडिलांचा शेतीचा व्यवसाय, अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेला हर्षल अभ्‍यासात हुशार होता. परंतु, नववर्षाच्‍या दुसऱ्याच दिवशी हर्षलचा मृत्‍यू झाल्‍याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain Alert : मान्सून अंदमानात दाखल होताच वातावरण बदललं; या भागात तुफान पाऊस कोसळणार

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, २० मे २०२४ : मेषसह ४ राशींना मिळणार नशीबाची उत्तम साथ, तुमची रास कोणती?

Horoscope Today: तुमच्यासाठी सोमवार सुखाचा ठरेल की दुखाचा? वाचा राशिभविष्य

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

SCROLL FOR NEXT