Rain 
महाराष्ट्र

वादळी पावसाचे थैमान; पाय घसरून युवक गेला वाहून

वादळी पावसाचे थैमान; पाय घसरून युवक गेला वाहून

साम टिव्ही ब्युरो

पाचोरा (जळगाव) : येथील शहर व परिसरात सोमवारच्या मध्यरात्री वादळी पावसाने अक्षरशः थैमान घातले. तर आज (ता.२८) सायंकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. या दरम्‍यान पुराच्‍या पाण्यातून पर्यायी रस्त्याने घरी जात असताना पाय घसरून युवक वाहून गेला आहे. (jalgaon-news-pachora-Thunderstorms-The-youth-slipped-and-carried-away)

गुलाब वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहराच्या बहुतांश भागात पाणी साचले. शिवाजीनगरातील नाला अरुंद झाल्यामुळे जनता वसाहतीतील बहुतांश घरांमध्ये पाणी शिरले. मिलिंदनगर, नागसेननगर भागातही पावसामुळे घर सामानाचे नुकसान झाले. रेल्वे भुयारी मार्गाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याने भडगांव रोड भागातील रहिवाशांचा शहराशी संपर्क तुटला. बौद्ध विहार परिसरातही पाणी साचले.

कृष्णापुरी भागातून युवक वाहिला

पावसामुळे गिरणा, हिवरा, तितुर, अग्नावती, बहूळा या नद्यांना पूर आला आहे. कृष्णापुरी भागातील साहेबराव पांचाळ या युवक कृष्णापुरी भागातून पुलाजवळच्या पर्यायी रस्त्याने घरी जात असताना पुरात पाय घसरून पुराच्या पाण्यात पडून वाहून गेला.

पावसाची रिपरिप सुरूच

मंगळवारी सायंकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. प्रशासनाने गुलाब वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने दिलेल्या निर्देशानुसार नदी काठच्या रहिवाशांसह इतरांनाही सावधानतेचा इशारा दिला आहे. कापसासह खरीप उत्पादनाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल महसूल विभागातर्फे सुरू करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jui Gadkari: जुई गडकरीचा मराठमोळा अंदाज; फोटो पाहून सौंदर्याचं कौतुक

Indian Railway: आता मोठं बिऱ्हाड ट्रेननं नेता येणार नाही; विमान प्रवासाचा नियम रेल्वेमध्ये होणार लागू, वाचा काय आहे कारण

Maharashtra Rain Live News : - भर पावसात कृषिमंत्री दत्ता भरणे शेतकऱ्यांच्या बांधावर

Swara Bhaskar : मला डिंपल यादववर क्रश आहे, सगळे bisexual आहोत; स्वरा भास्करचं वक्तव्य, VIDEO

Loksabha: मुख्यमंत्री असो पंतप्रधान खुर्ची जाणारच; लोकसभेत सादर होणार विधेयक काय आहे, काय होणार परिणाम?

SCROLL FOR NEXT