महाराष्ट्र

गालिचा रांगोळी सातासमुद्रापार; पाचोऱ्याच्‍या शितल पाटील कलाकृती स्पेनमधील महोत्सवात

गालिचा रांगोळी सातासमुद्रापार; पाचोऱ्याच्‍या शितल पाटील कलाकृती स्पेनमधील महोत्सवात

साम टिव्ही ब्युरो

पाचोरा (जळगाव) : पाचोरा येथील शीतल पाटील यांची रांगोळी कला देशाच्या सीमा ओलांडून सातासमुद्रापार पोहचली. स्पेनमधील पवित्र महोत्सवासाठी त्यांच्या रांगोळीची निवड झाली आहे. त्यांच्या या यशाचे व कलेचे कौतुक होत आहे. (jalgaon-news-pachora-shital-patil-art-selection-spain-pavitra-mahotsav)

स्पेनमधील सांतीयागो या शहरात ५ ते ११ वर्षाच्या अंतराने जेकेबिन (पवित्र) वर्ष साजरे केले जाते. यानिमित्ताने स्वर्गाचे दरवाजे उघडले जातात व परमेश्वर सर्वांच्या चुका माफ करून सुख- समृद्धी प्रदान करतो; अशी यामागील श्रध्दा व भावना आहे. ‘अल्फ कामिनो दि सांतीयागो' या आंतरराष्ट्रीय संस्थेच्यावतीने हा पवित्र महोत्सव साजरा केला जातो.

तीस देशातील कलावंतांची निवड

स्‍पेनमध्‍ये आयोजित महोत्‍सवात जगातील विविध ठिकाणी कलाकारांची निवड केली जाते. या पवित्र महोत्सवासाठी ३० देशातील २० रांगोळी कलावंतांच्या कलेची निवड करण्यात आली असून भारतातून सांगलीचे आंतरराष्ट्रीय रांगोळी कलावंत किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली २५ भारतीय कलावंतांची निवड करण्यात झाली आहे. त्यात पाचोरा येथील शीतल पाटील यांचा समावेश आहे. त्यांनी उत्कृष्ट रंगसंगती साधत आकर्षक व मनोवेधक गालीचा रांगोळी रेखाटून ती या महोत्सवात सादर करून भारताचे नेतृत्व केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guru-shani Yog: पुढच्या वर्षी शनी-गुरु बनवणार अद्धभुत संयोग; दोन-ग्रह या राशींना पदोपदी देणार यश

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा या देशावर हल्ल्याचा आदेश, ISIS वर अमेरिकन सैन्याचा एअर स्ट्राइक

Maharashtra Live News Update: प्रकाश महाजन करणार शिवसेनेत प्रवेश

Success Story: चालताना अडचणी, नीट बोलता येत नव्हते, दिव्यांग असूनही क्रॅक केली UPSC; IRS मानवेंद्र सिंह यांचा प्रवास

Todays Horoscope: आजच्या दिवशी कोणाच्याही मदतीची अपेक्षा करू नका, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT