Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: मोबाईलसाठी शालेय विद्यार्थ्याची आत्‍महत्‍या

मोबाईलसाठी शालेय विद्यार्थ्याची आत्‍महत्‍या

साम टिव्ही ब्युरो

पाचोरा (जळगाव) : सातगाव डोंगरी (ता. पाचोरा) येथील नववीत शिकणाऱ्या पंधरा वर्षे वयाच्या शेतकरी (Farmer) कुटुंबातील विद्यार्थ्यांने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना सोमवारी घडली. पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी (Police) अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. (Tajya Batmya)

ऋषिकेश संतोष आवारे (वय १५) असे आत्महत्या केलेल्या (Student) विद्यार्थ्याचे नाव आहे. या विद्यार्थ्याचे आई- वडील शेतमजुरी करतात. ऋषिकेश देखील शिक्षणासोबत शेळ्या चारणे व आई वडिलांसोबत शेतीकाम करून मदतीचा हात देत असे. त्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ऋषिकेशने हे (Jalgaon) टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत तर तर्कवितर्क काढले जात आहेत. पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी रामकृष्ण पाटील तपास करीत आहेत.

मोबाईल घेऊन न दिल्‍याने टोकाचे पाऊल

ऋषिकेश याच्या मोठ्या भावाला वडीलांनी मोबाईल घेऊन दिला. यानंतर ऋषिकेशनेही मोबाइल घेऊन देण्याचा आग्रह वडीलांकडे धरला होता. मात्र आर्थिक परीस्थिती हालाखीची असल्याने मोबाइल घेऊन देऊ शकले नाहीत. यामुळेच ऋषिकेशने टोकाचे पाऊल उचल्‍याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol-Diesel Crisis: पेट्रोल मिळत नसल्याने तरुणाची सटकली, थेट दुचाकीच पेटवून दिली; VIDEO व्हायरल

Thane Travel : एकाच दिवशी करा ३ किल्ल्यांचा रोमांचक ट्रेक, मुंबईजवळ आहे 'हे' खास लोकेशन

धाड धाड...! घरातून मध्यरात्री गोळीबाराचा मोठा आवाज आला; दरवाजा उघडल्यानंतर पुजाऱ्याच्या कुटुंबातील सर्वच हादरले

Dhurandhar 2 : 'धुरंधर २'नं 'पुष्पा २'ला पछाडलं; दुसऱ्या शनिवारी रणवीर सिंहने रचला मोठा इतिहास, वाचा कलेक्शन

Maharashtra Live News Update: वाशिमच्या जनसंघर्ष अर्बन निधी शाखेतील साहित्य पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT