Onion Oil Vs Rosemary Oil: कांद्याचे तेल की रोझमेरी तेल, केसांच्या वाढीसाठी कोणते तेल फायदेशीर?

Manasvi Choudhary

केसांची वाढीसाठी तेल

केसांची वाढ आणि केसगळती थांबवण्यासाठी कांद्याचे तेल आणि रोझमेरी तेलाचा वापर फायदेशीर मानला जातो.

Long Hair Tips

दोन्ही तेलापैकी कोणती फायदेशीर?

कांद्याचे तेल आणि रोझमेरी तेल या दोन्ही तेलापैकी कोणते तेल केसांच्या वाढीसाठी निवडावा ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Hair Oil | yandex

कांद्याच्या तेलाचे फायदे

कांद्याच्या तेलामध्ये पोटॅशियम आणि अँटी-ऑक्सिडंट्स असते. जे केसांच्या मुळांना मजबूत करते आणि केस उगवण्यासाठी फायदेशीर मानले जाते.

Onion Hair Oil

रक्ताभिसरण सुधारण्यास होते मदत

कांद्याचे तेल केसांना लावल्याने टाळूचे रक्ताभिसरण चांगले होते ज्यामुळे केसांची गळती थांबते आणि केसांची वाढ होते.

Hair Oil

कोंडा होतो दूर

कांद्याचे तेल केसांना लावल्याने कांद्याच्या तेलातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे टाळूवरील इन्फेक्शन आणि कोंड्याची समस्या दूर होते.

Hair Dandruff Oil

रोझमेरी तेलाचे फायदे

रोझमेरी ही एक औषधी वनस्पती असून रोझमेरीच्या पानांचे तेल केसांसाठी फायदेशीर आहे. हे तेल केसांच्या टाळूला लावून मालिश केल्याने केसांची वाढ होते.

Rosemary Oil | yandex

केसांची वाढ होते

रोझमेरी तेल केसांना लावल्यने नवीन केस येण्यास मदत होते. हे तेल केसांना लावल्याने केसांची वाढ मुळापासून होते.

Rosemary Oil

केस तेलकट होत नाही

रोझमेरी तेल कांद्याच्या तेलाप्रमाणे चिकट किंवा उग्र नसते. रोझमेरी तेलाचा सुगंध अतिशय फ्रेश असतो. रोझमेरी तेल केसांना लावल्याने मन प्रसन्न होते.

Hair Oil Massage

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: Without Sugar Tea: चहामध्ये साखर टाकणे बंद केल्यास शरीरात होतात 5 मोठे आश्चर्यचकित बदल

Without Sugar Tea
येथे क्लिक करा...