Shreya Maskar
अलिबागला गेल्यावर कुलाबा किल्ल्याला भेट द्या. या किल्ल्याला अलिबाग किल्ला असेही म्हणतात. हा रायगड जिल्ह्यात, अलिबाग समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे १ ते २ किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात स्थित आहे.
कुलाबा किल्ला अरबी समुद्राच्या खऱ्या पाण्याने पूर्णपणे वेढलेला असूनही, या किल्ल्यावर गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत ज्यांतून वर्षभर पाणी मिळते.
कुलाबा किल्ल्याचे बांधकाम छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६८० मध्ये सुरू केली होती आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी राजे यांनी १६८१ मध्ये त्याचे काम पूर्ण केले.
कुलाबा किल्ला हा ३०० वर्षे जुना सागरी किल्ला असून तो अलिबाग किनाऱ्यापासून १-२ किलोमीटर अंतरावर स्थित आहे. मराठा साम्राज्याचे मुख्य नौदल केंद्र म्हणून हा किल्ला प्रसिद्ध आहे.
कुलाबा किल्ला अरबी समुद्रातील एका बेटावर वसलेला आहे. ओहोटीच्या वेळी जेव्हा समुद्राचे पाणी मागे सरकते, तेव्हा पर्यटक चालत किंवा घोडागाडीने उथळ पाण्यातून किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जाऊ शकतात.
मुंबईहून कुलाबा किल्ल्यावर जाण्यासाठी, तुम्ही आधी फेरीने किंवा रस्त्याने अलिबागला जाऊ शकता आणि त्यानंतर अलिबाग बीचवरून त्या बेटावरील किल्ल्याकडे जा.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.