वाचले प्राण 
महाराष्ट्र

थरारक अनुभव..त्‍यांनी पुराच्या पाण्यात उड्या मारल्या अन्‌ वाचले प्राण

थरारक अनुभव..त्‍यांनी पुराच्या पाण्यात उड्या मारल्या अन्‌ वाचले प्राण

साम टिव्ही ब्युरो

पाचोरा (जळगाव) : अपघातातून थोडक्‍यात बचावले तर काळ आला होता, पण वेळ आली नव्हती.. या वाक्याचा वापर ऐकतो अथवा अनुभवतो. असाच काहीसा अनुभव लासुरे (ता. पाचोरा) येथील अतुल देवरे या शेतकऱ्याबाबत घडला. पुराच्या पाण्यात ते दोघे मदतीला आले नसते अन्‌ त्‍यांनी उड्या मारल्या नसत्या तर..बैलासह शेतकऱ्याला प्राण गमवावे लागले असते. (jalgaon-news-pachora-In-flood-waters-two-porson-help-in-boy-and-save-life)

लासुरे (ता. पाचोरा) येथील अतुल देवरे (वय ३२) हे चुलत भाऊ कपिल देवरे यांच्या मालकीची बैलगाडी घेऊन शेताकडे निघाले होते. गावाबाहेरच्या रस्त्यावर नदीकाठी नेहमीच्या ठिकाणी बैलांना पाणी पाजण्यासाठी ते थांबले. पाणी पीत असताना बैलांचे पाय अचानक घसरले व बैलगाडीसह अतुल देवरे हे पुराच्या पाण्यात पडले. पुराच्‍या पाण्यात पडल्‍याने आता आपला मृत्‍यू डोळ्यासमोर दिसत होता.

काही न पाहता त्‍यांनी मोरल्‍या उड्या

सदरचा प्रकार जवळ असलेल्या मस्तान तडवी (लासुरे) व सागर कोळी (वरखेडी) यांनी बघितला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पुराच्या पाण्यात उड्या घेतल्या. प्रथम पुरात वाहून जाणाऱ्या अतुल यांना त्यांनी बाहेर काढले. नंतर एक बैल बाहेर काढला. दुसरा बैलही हाती लागला; परंतु तो मृत झालेला होता. कपिल देवरे यांचा ४० हजाराचा बैल या घटनेत मृत झाला.

जागा होती नेहमीचीच

आठवडाभरापासून नदीला पूर असल्याने बैलांना पाणी पाजण्याच्या ठिकाणी खड्डा पडला होता. त्यामुळे दोघे बैल गाडीसह पाण्यात पडले. तडवी व कोळी या दोघांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन बैल व शेतकऱ्याला वाचवण्यासाठी पुराच्या पाण्यात मारलेली उडी अतुल देवरे व एका बैलाचा प्राण वाचविण्यात यशस्वी झाली. या दोघांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. पोलीस पाटील संजय पाटील, तलाठी रूपाली रायगडे, पशुवैद्यक अधिकारी महाजन यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेमुळे काळ आला होता, पण तडवी व कोळी यांनी उड्या मारल्या नसत्या तर... याच विषयाची भीतीदायी व थरकाप उडविणारी चर्चा लासुरे व वरखेडी गावात रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT