जळगाव : सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनसह विविध विभागातील कामगार संघटनांकडून आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण करून त्यांना कवडीमोल भावाने कॉर्पोरेटसच्या झोळीत टाकले जात असल्याचा आरोप यावेळी संघटनाकडून करण्यात आला. (jalgaon news Organizations rallied against privatization)
शहरातील (Jalgaon News) बळीराम पेठे येथून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. टॉवर चौक, कोर्ट चौक, स्वातंत्र्य चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चात महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन, महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटना, बँक (Bank) कर्मचारी संघटना, एलआयसी कर्मचारी संघटना, रेल्वे कर्मचारी संघटना, मॅकेनिकल युनियन, आशा-गट प्रवर्तक, बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन यासह विविध केंद्रीय कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या.
घोषणाबाजी करत मांडल्या मागण्या
संघटनांकडून घोषणाबाजी करण्यात येऊन श्रमसंहिता रद्द करा, कामगारांच्या बाजूचे सर्व कामगार कायदे पुन्हा प्रस्थापित करून त्यांची कडक अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली व शासकीय विभागांचे करण्यात येणारे खाजगीकरण रद्द करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.