Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: दिवाळीच्‍या दिवशीच कुटुंबावर दुःखाचा अंधार; महावितरणच्या तंत्रज्ञासह एकाचा शॉक लागून मृत्यू

दिवाळीच्‍या दिवशीच कुटुंबावर दुःखाचा काळोख; महावितरणच्या तंत्रज्ञासह एकाचा शॉक लागून मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

फत्तेपूर (जळगाव) : दिवाळीचा सण साजरा होत असताना नेमाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मादणी शिवारातील शेतात विजेच्या धक्क्याने महावितरण (Mahavitaran) कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञ व त्यांचा मदतनीस यांचा मृत्यू (Death) झाल्‍याची घटना घडली आहे. (Live Marathi News)

पोलिस (Police) दूरक्षेत्र फत्तेपूर येथे याबाबत कर्मचारी कमलेश रामदास जमुने यांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हाळा (ता. भुसावळ) येथील वीज उपकेंद्राचे वरिष्ठ तंत्रज्ञ गणेश प्रकाश नेमाडे (वय ४५) व त्यांचा मदतनीस सुनील भरतसिंग चव्हाण (वय ४५, रा.टाकळीपिंप्री, ता.जामनेर) हे अशोक हिरालाल फुलफगार यांचे मादणी शिवारातील शेत गट क्रमांक ८६ मधील तुटलेल्या विजेच्या एल.टी. लाइनचा तार जोडण्यासाठी गेले होते. त्यांनी त्या तारेला हातात धरल्याने विजेचा धक्का (Electric Shock) लागला. त्यात सुनील भरतसिंग चव्हाण हे गंभीर जखमी झाले. तर गणेश प्रकाश नेमाडे मृत झाले.

दरम्यान, गंभीर जखमी सुनील चव्हाण यांना जळगाव येथे घेऊन जात असताना जामनेरच्या जवळ त्यांचा देखील मृत्यू झाला. दोघ मृतदेहांची उत्तरीय तपासणी जामनेर येथे होणार आहे. तसेच काळ्या रंगाची वगार विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडली. तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी किरण शिंपी करीत आहेत. सुनील परदेशी यांच्या भर दिवाळीच्या दिवशी अचानक जाण्याने टाकळीपिंप्री गावावर शोककळा पसरलेली आहे. आजच्या घटनेने डिसेंबर २०१० मध्ये जलिल कुरेशी या झिरो वायरमनचा असाच विजेच्या खांबावर चढलेला असताना जळांद्री येथे मृत्यू झाला होता. त्याची आठवण फत्तेपूरकरांना झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike 2026 : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News! DA थेट १८% वर; जुलैपासूनची थकबाकीही मिळणार

Amitabh Bachchan: मुंबईत खळबळ! बिग बी अमिताभ बच्चन यांचा 'जलसा' बंगला बॉम्बने उडवण्याची धमकी

Maharashtra News Live Update: ऐन दिवाळीत बोगस बियाणे पीडित शेतकरी आक्रमक

NCP Merger: मोठी बातमी! 'अजितदादा असते तर राष्ट्रवादीचे विलिनीकरण झालं असतं', सुनील तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Health Tips : डायबिटीजमध्ये वांगी खाणे आरोग्यासाठी कितपत फायदेशीर आहे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT