Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : कुलरचा शॉक लागून एकाचा मृत्यू; पाणी टाकत असताना घडली घटना

Jalgaon News : दरम्यान १ जूनला ते ड्यूटी आटोपल्यानंतर दुपारी घरी आले. उकाडा होत असल्याने त्यांनी कुलर लावले. मात्र त्यात पाणी नव्हते

Rajesh Sonwane

जळगाव : सध्या उन्हाचा कडाका अधिक असल्याने घरात कुलरचा वापर केला जात आहे. प्रामुख्याने खिडकीत लावण्यासाठी डेझर्ट कुलर वापरले जातात. दरम्यान बाहेरून आल्यानंतर कुलर लावून त्यात पाणी टाकत असताना विजेचा जोरदार झटका बसला. यात एका इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरात घडली. तर या घटनेत लहान मुलगा थोडक्यात बचावला आहे. 

जळगाव (Jalgaon) शहरातील बिबानगर परिसरात वास्तव्यास असलेले भास्कर आत्माराम बोरसे (वय ४८) यांचा मृत्यू झाला आहे. भास्कर बोरसे हे राज्य परिवहन महामंडळामध्ये चालक म्हणून कार्यरत होते. मूळ जळगाव तालुक्यातील कठोरा येथील रहिवासी असून मुलांचे शिक्षण आणि ड्यूटीमुळे जळगावात स्थायिक झाले होते. दरम्यान १ जूनला ते ड्यूटी आटोपल्यानंतर दुपारी घरी आले. उकाडा होत असल्याने त्यांनी कुलर लावले. मात्र त्यात पाणी नव्हते. 

यामुळे त्यांनी कुलर चालू असताना त्यात पाणी टाकायला गेले. यावेळी कूलरचा (electric Shock) जोरदार धक्का लागून ते दूरवर फेकले गेले. त्यात ते जागीच बेशुद्ध पडले. घडलेला प्रकार पाहून मुलगा धावला. यात त्यालाही विजेचा धक्का लागला, मात्र तो थोडक्यात बचावला. या प्रकारामुळे बोरसे यांच्या घरात एकच आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी मदतीला धाव घेतली. तत्काळ बोरसे यांना जिल्‍हा रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT