Jalgaon News Marriage
Jalgaon News Marriage Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: मन हेलावून टाकणारी घटना..हळद लागली अन्‌ आईने सोडले प्राण; विवाह लावून आईची इच्‍छा केली पुर्ण

Rajesh Sonwane

जळगाव : मुलाचे किंवा मुलीचे लग्‍न सोहळा म्‍हटला की घरात सर्व तयारी अन्‌ आनंदाला उधाण असते. यात मुलगा एकुलता एक असला तर हा आनंद काही औरच असतो. परंतु, आपल्‍या डोळ्यादेखत मुलाचे (Marriage) लग्‍न व्‍हावे; अशी इच्‍छा प्रकट करणारी आई मुलाच्‍या हळदीच्‍याच दिवशी जगाचा निरोप घेते. ही मन हेलावून टाकणारी घटना (Amalner) अमळनेर तालुक्‍यातील निम येथे घडली. छातीवर दगड ठेवून नातेवाईकांनी मुलाचे लग्‍न लावून आईची ईच्‍छा पुर्ण केली. (Maharashtra News)

अमळनेर तालुक्यातील निम येथील काबाळकष्ट करणारे दाम्पत्य सरलाबाई गुर्जर व गुलाब सुपडू गुर्जर यांनी काळ्या मातील घाम गाळून मुलगा व मुलीला उच्च शिक्षित करून मुलाला अभियंता केले. मुलीचे लग्न झाले, मात्र मुलाला नोकरी लागली. परंतु, इकडे आई सरलाबाईला कॅन्‍सरने ग्रासले. यामुळे वर्षभरापासून (Jalgaon News) आईची प्रकृती चिंताजनक होती. यामुळे मुलाचे लग्न माझ्या डोळ्यादेखत व्हायला हवे; म्हणून पती गुलाब गुर्जर यांचाकडे इच्‍छा व्यक्त केली. यानुसार गुलाब गुर्जर व भाऊ राजेंद्र पाटील यांनी मुलगा बांधकाम अभियंता असलेल्या राकेशसाठी मंगरूळ (ता. चोपडा) येथील अशोक गंगाधर पाटील यांची मुलगी रोहिणी हिच्‍याशी विवाह निश्‍चीत केला. त्‍यानुसार ३ मेस हळद व ४ मेस विवाह सोहळा नियोजित केला.

नववर– वधूला दिला आशिर्वाद

लग्न दोन दिवसांवर असताना आई सरलाबाईला अधिक त्रास जाणवू लागला. यामुळे अमळनेर येथे उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांना नातेवाईकांनी लग्नाची कल्पना देऊन ठेवली होती. हळदीचा दिवस उजाळला. ३ मेस देवांना नारळ अर्पण करून हळद लावण्याआधी मुलगा राकेश व नववधू रोहिणी यांनी रुग्णालयात अंथरुणावर असलेल्या आई सरलाबाईचे आशीर्वाद घेतले. आई सरलाबाईने नववधू– वर मुलाला जोडीत पाहून प्रसन्न होऊन आशीर्वाद देऊन बेटा नाराज राहू नको, मी लवकर उठून उभी राहील काळजी करू नको. सून रोहिणीला अष्टपुत्र सौभाग्यवती म्हणत दोन्हींच्या पाठीवरून हात फिरविला. हळदीला उशीर होईल म्हणून लवकर जायला सांगितले.

अन्‌ त्‍यांनी जगाचा निरोप घेतला

यानंतर मुलाला हळद लागत असताना व्हिडीओ कॉलने पाहून पाणी मागितले. शेवटी हळद लागली पाहून सरलाबाई डॉक्टरांनी सांगितले की आता माझी इच्छा पूर्ण झाली, मला चिंता नाही म्हणून सायंकाळी सव्‍वासातच्‍या सुमारास त्‍या कायमच्‍या निघून गेल्‍या. रुग्णालयात नातेवाईक व कुटुंबिय, गावातील भावबंध यांना सरलाबाईच्या निधनाची बातमी दिली. मात्र विवाह सोहळा नियोजित असल्याने सरलाबाईच्या निधनामुळे छातीवर दगड ठेवून सरलाबाईंची इच्छा पूर्ण करत हृदयात दुःख साठवून लग्न सोहळा पार पाडला. मात्र लग्‍न लागल्‍यावर राकेशने टाहो फोडत आई तुझी इच्छा पूर्ण केली. मात्र मला आताच तू कायमस्वरूपी सोडून गेली म्हणून हंबरडा फोडला. शेवटी वडील, काका व नातेवाईकांनी धीर देत सरलाबाईचा मृतदेह गावी आणून गावी अंत्यसंस्कार केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT