Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : काम नसल्याने बेरोजगार तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

Jalgaon News : पूर्वी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये रोजंदारीवर काम करीत होता. सध्या महिन्याभरापासून त्याच्याकडे कुठलेच काम नसल्याने तो घरीच होता

Rajesh Sonwane

जळगाव : रोजंदारीने काम करत असताना सद्यस्थितीला कोणतेही काम नसल्याने बेरोजगार असलेल्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना जळगावमध्ये समोर आली आहे. हा तरुण उत्तर प्रदेशातील असून कामानिमित्ताने जळगावमध्ये आलं होता. 

रंजन प्रसाद मौर्य (वय ३२, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव, मूळ रा. संत रविदासनगर, बदुही, उत्तर प्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे. सदर घटना ३ जूनला सकाळी उडकीस आली. रंजन मौर्य हा पूर्वी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये रोजंदारीवर काम करीत होता. सध्या महिन्याभरापासून त्याच्याकडे कुठलेच काम नसल्याने तो घरीच होता. (Jalgaon) जळगावच्या एमआयडीसी परिसरातील सुप्रीम कॉलनीत तो खोली करून एकटाच राहत होता. 

काम नसल्याने घरात एकटाच असलेल्या रंजन याने रात्री एकनंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. सकाळी आठला त्याच्यासोबतच्या कामगारांना तो बाहेर दिसून आला नाही. यामुळे खोलीवर गेले असता, तो दरवाजा उघडत नव्हता. शेजाऱ्यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून पाहिले, तर रंजन मौर्य गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri 2025 : नवरात्रीत देवीला दाखवा 'हा' खास नैवेद्य, अननसापासून बनवा युनिक स्वीट डिश

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट, पुढचे ३ तास धो धो पावसाची शक्यता

Huma Qureshi Engagement : हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा? होणारा नवरा कोण?

ST Bus : एसटी महामंडळाची नवी योजना, २७ सप्टेंबरपासून होणार सुरू, तिकिट किती?

ITR Filling: कामाची बातमी! आयटीआर फाइल करण्यासाठी मुदतवाढ, सरकारने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT