Husband Wife death 
महाराष्ट्र

पत्‍नीच्‍या मृत्‍यूची बातमी आली; इकडे पतीनेही घेतला गळफास

पत्‍नीच्‍या मृत्‍यूची बातमी आली; इकडे पतीनेही घेतला गळफास

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मुंबई येथे उपचारासाठी गेलेल्‍या पत्‍नीचा मृत्यू झाला. याची बातमी मुलाकडून पतीला समजली. पत्‍नीचे अंत्‍यसंस्‍कार करण्याची तयारी पहाटे करायची होती. परंतु, आपली अर्धांगिनी गेल्‍याचे दुःख अनावर झाले अन्‌ घरी एकट्या असलेल्‍या पतीने गळफास घेत जीवनयात्रा संपविली. (jalgaon-news-newsofhiswife'sdeath-the-husband-so-took-the-gallows-and-suicide)

लाडली (ता. धरणगाव) येथील मुळ रहिवासी अरूण खंडू सोनवणे हे जळगावातील नागसेननगरात पत्नी मीराबाई आणि मुलगा अनिकेत यांच्यासह वास्‍तव्‍यास होते. जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत हमालीचे काम करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होते. मागील काही महिन्यांपासून मिराबाई सोनवणे यांना दुर्धर आजार जडला होता. उपचारासाठी काही दिवसांपुर्वी त्‍यांना मुंबई येथे नेण्यात आले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अनिकेत होता.

भाऊ आल्‍यानंतर प्रकार उघडकीस

मीराबाई सोनवणे यांच्‍यावर मुंबईत उपचार सुरू असताना रविवारी (३१ ऑक्टोबर) त्‍यांचा मृत्यू झाला. त्यावेळी अरूण सोनवणे हे जळगावात घरी एकटेच होते. मुलगा अनिकेत याने वडीलांना फोन करून माझी आई गेली..म्‍हणून फोन केला. पत्नी मिराबाईच्या मृत्‍यूची बातमी एकताच अरुण सोनवणे यांना धक्‍का बसला. पत्‍नीच्‍या मृत्यूचा धसका घेवून घरी एकट्या असलेल्‍या अरुण सोनवणे यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. सोनवणे यांचे लहान भाऊ सुनिल सोनवणे हे सकाळी घरात आवराआवर करण्यासाठी आले असता सदर प्रकार समोर आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्मशानात जातो, करणी करतो, चुटकी वाजवतो अन् भूतबाधा काढतो; कोल्हापुरात भोंदूगिरीचा कहर; धक्कादायक VIDEO व्हायरल

Shocking : धक्कादायक! भर लग्नमंडपात नवरदेवावर हल्ला, बोहल्यावर चढणार इतक्यात...

Google Doodle Equation: गुगल डुडलवर आज गणिताची समीकरणं; जाणून घ्या काय आहे भन्नाट प्रकार

Kids Tea Drinking Risks : लहान मुलांना चहा देत असाल तर सावधान! हे दुष्परिणाम वाचा

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र ATS ची पुण्यात छापेमारी

SCROLL FOR NEXT