महाराष्ट्र

आजपासून टोल वसुली; काम अपुर्ण असल्‍याचे सांगत राष्‍ट्रवादीचा विरोध

आजपासून टोल वसुली; काम अपुर्ण असल्‍याचे सांगत राष्‍ट्रवादीचा विरोध

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : केंद्रीय रस्ते विभागातर्फे जळगाव जिल्‍ह्यातील नशिराबाद ते मुक्ताईनगर चौपदरी रस्त्यांचे काम सुरू आहे. त्याची टोल वसुली आजपासून (ता. १५) सुरु करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या टोल वसुलीला विरोध दर्शविला आहे. तसेच आंदोलनाचा इशारा दिला आहे. (jalgaon-news-nashirabad-Toll-collection-from-today-Opposition-of-NCP-that-the-work-is-incomplete)

नशिराबाद ते मुक्ताईनगर असा चौपदरीकरण महामार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यातील काही भागाचे काम पूर्ण झाले. नशिराबाद ते भुसावळपर्यंत रस्त्याचे काही अंशी काम झाले आहे. मात्र या रस्त्याचे बहुतांश काम बाकी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे. आता याच रस्त्यावर नशिराबाद येथे टोल नाका सुरू करत आजपासून (ता.१५) हा नाका सुरू करण्यात येत असून त्याचे वाहनाचे दरही जाहीर करण्यात आले आहे.

जनतेला आतपासून भुर्दंड का?

राष्ट्रवादी काँग्रेसने हा टोल नाका सुरू होण्याच्या अगोदरच विरोध दर्शविला आहे. जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने टोल नाका सुरू करण्यास विरोध केला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी सांगितले की, या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मात्र त्याची टोल वसुली सुरू करून जनतेला आतापासून भुर्दंड देण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने अगोदर रस्त्याचे काम पूर्ण करावे; त्यानंतर टोल घ्यावा. मात्र आता टोल सुरू करण्यास आमचा तीव्र विरोध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palak Benefits : हिवाळ्यात पालक खाण्याचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana: फक्त या लाडक्या बहिणींनाच मिळणार नोव्हेंबरचा हप्ता, तुम्ही पात्र आहात का? वाचा सविस्तर

Lucky zodiac signs: आज कोणाला मिळणार शुभवार्ता? चंद्र तूळ राशीत असल्याने 4 राशींना मिळणार मोठा फायदा

Maharashtra Live News Update: पुण्यात संध्याकाळी सात नंतर पेट्रोल पंप राहणार बंद

Bigg Boss 19 : "या स्पर्धकापासून दूर राहा"; मास्टरमाइंड गौरव खन्नाला बायकोने दिला सल्ला, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT