jalgaon zp 
महाराष्ट्र

जळगाव जिल्‍हा परिषदेत १८ कोटींचे परस्पर नियोजन; उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार

जळगाव जिल्‍हा परिषदेत १८ कोटींचे परस्पर नियोजन; उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Rajesh Sonwane

जळगाव : जिल्हा परिषदेत निधी वाटपात पदाधिकाऱ्यांसह काही सदस्यांना त्यांच्याच गटात विकास कामांसाठी निधी नियोजित केला जातो. अन्य सदस्यांना मात्र विश्वासात न घेता निधी तोडकाच दिला जातो. सत्ताधाऱ्यांसह गटनेते व काही ठरावीच सदस्यांना सोबत घेवून १८ कोटीचे परस्‍पर नियोजन करण्यात आले आहे. शिवाय त्‍यास मान्यता घेण्याचा घाट देखील सुरू असल्‍याचा आरोप राष्‍ट्रवादीच्‍या (NCP) सदस्‍या डॉ. निलम पाटील यांनी केला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्‍याकडे तक्रार केल्‍याचे देखील त्‍यांनी सांगितले. (Mutual planning of 18 crores in Jalgaon Zilla Parishad Complaint to Deputy Chief Minister)

जिल्‍हा परिषदेच्या (Jalgaon Zilha Parishad) सत्ताधारी सदस्‍यांकडून मागील पाच वर्षापासून निधी वाटपात अन्याय केला जात आहे. गटनेते सत्ताधाऱ्यांशी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून स्वत:च्या गटात कामे मंजुर करून घेतात. अन्य सदस्यांना मात्र वाऱ्यावर सोडतात. याबाबत देखील उपमुख्‍यमंत्रीकडे तक्रार केली. विषेश म्हणजे भाजपाच्या (BJP) सदस्यांना देखील निधी देतांना मापात पाप केले जात असुन राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या अनेक सदस्यांना निधीत मोठ्या प्रमाणात कुचराई केली जात आहे. काही सदस्यांच्या पदाधिकाऱ्यात कोटीची कामे दिली आहे. तर अन्य सदस्यांच्या गटात देखील ४० लाखाचा फरक निधी वितरीत करतांना झाला आहे.

उद्या उपमुख्‍यमंत्रींची घेणार भेट

३०५० व ५०५४ तसेच सिंचनाच्या हेडवरील १८ कोटीची कामे यात ठराविक सदस्यांचीच कामे दिली. त्यात आमच्यावर अन्याय झाला असल्‍याचे डॉ. निलम पाटील यांनी सांगितले. याबाबत माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा केली आहे. १८ कोटीचा निधी थांबवा या मागणीसाठी एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांच्यासह जिल्हाध्यक्ष ॲड. पाटील व स्‍वतः देखील ५ जानेवारीला मुंबई येथे उपमुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांची भेट घेणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

भाजप सदस्‍यांचाही आरोप

निधी वाटपासंदर्भात भाजपच्‍या सदस्‍यांमध्‍ये देखील नाराजी आहे. यात भाजपचे निलेश पाटील, निर्मला पाटील यांनी देखील निधी वाटपाबाबत नाराजी व्यक्त करत पदाधिकाऱ्यांबाबत संताप व्यक्त केला. सत्ता आमची पण आम्हालाच निधी कमी मिळतो आहे. पदाधिकारी व काही ठराविक सदस्यच निधी वाटप करून नियोजन करतात. अन्य सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही असे आरोप त्यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT