Jalgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

मालकाकडे ५० लाखांची चोरी; बिहारच्या तरुणाला भुसावळात अटक

मालकाकडे ५० लाखांची चोरी; बिहारच्या तरुणाला भुसावळात अटक

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : बांधकाम व्यावसायिकाच्या घरातून ५० लाखांचा माल लांबवणाऱ्या नोकराला भुसावळ (Bhusawal) रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलिस व आरपीएफने मुद्देमालासह अटक केली. अंत्योदय एक्स्प्रेसने बिहारकडे (Bihar) प्रवास करत असताना चोरटा पकडला गेला. चौकशीत आरोपीने वेळेवर पगार होत नसल्याचे चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली. (Jalgaon News Theft Case)

मुंबईतील (Mumbai) खार येथील बांधकाम व्यावसायिक मुकेश गांधी यांच्याकडे राहुल कामत (बिहार) हा कामाला होता. मालक पत्नीसह बाहेरगावी फिरायला गेल्याची संधी साधून राहुलने घरातील तिजोरी फोडून सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून सुमारे ५० लाखांचा मुद्देमाल लांबवला (Theft) होता. यानंतर त्याने सूरत गाठले. तेथे थांबवल्यावर राहूलने रविवारी (२१ ऑगस्‍ट) सकाळी उधना येथून अंत्योदय एक्स्प्रेसने बिहारकडे प्रवास सुरू केला. दरम्यान चोरी उघड होताच गांधी यांनी खारघर पोलिसांत (Police) तक्रार दिली होती. आरोपी बिहारकडे पसार होईल, अशी शक्यता वर्तवली होती.

गाडीची तपासणीत सापडला

खारघर पोलिसांनी स्थानिक लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा यंत्रणेला संशयिताची छायाचित्रासह माहिती पाठवली. ही माहिती मिळताच भुसावळ येथील लोहमार्ग व आरपीएफ यंत्रणा सतर्क झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी अंत्योदय एक्स्प्रेस भुसावळ स्थानकावर येताच गाडीची तपासणी केली. त्यात जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या राहूलला ताब्यात घेण्यात आले. तपासणीत त्याच्याकडून सुमारे ४३ लाखांचे सोने, ३ लाख ८४ हजारांची रोकड, महागड्या घड्याळ, मोबाइल फोन, फाइल्स असा सुमारे ५० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई भुसावळ आरपीएफ निरीक्षक आर. के. मीना यांच्या पथकाने केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT