मुक्ताबाई  
महाराष्ट्र

दीड वर्षानंतर मुक्ताबाई समाधीस्थळी पदस्पर्श; भाविकांची गर्दी

दीड वर्षानंतर मुक्ताबाई समाधीस्थळी पदस्पर्श; भाविकांची गर्दी

संजय महाजन

मुक्ताईनगर (जळगाव) : कोरोना वैश्विक महामारीमुळे गेले १७ महिन्यांपासून भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेले संत मुक्ताबाई समाधीस्थळ कोथळी मुक्ताईनगर जुने मंदीर आज पहाटेपासून दर्शनार्थ खुले करण्यात आले. यामुळे भाविकांची गर्दी झाली होती. (jalgaon-news-Muktabai-Samadhisthala-temple-open-for-darshan-Crowd-of-devotees)

कोरोना महामारीमुळे सर्वच मंदिर दर्शनासाठी बंद होते. गतवर्षी नवरात्रोत्‍सवात देवीचे दर्शन न झाल्‍याने भाविकांचा हिरमोड झाला होता. यंदा मात्र कोरोना संसर्ग काहीसा कमी झाल्‍याने टप्‍प्‍याटप्‍प्‍याने सेक्‍टर सुरू केले. त्‍यानुसार घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिर खुले करण्याची परवानगी देण्यात आली. यामुळे देवीच्‍या दर्शनाचा मार्ग खुला झाला आहे.

मुक्‍ताई मंदिरात गर्दी

शासनाने घालून दिलेल्या निर्देशानुसार योगायोगाने संत मुक्ताबाई जयंती दिनी नवरात्रौत्सव घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर भाविकांना सातला दर्शनासाठी खुले करण्यात आले. दर्शनासाठी आसुसलेल्या भाविकांना प्रदिर्घ कालावधीनंतर प्रत्यक्ष गाभाऱ्यात जावून पदस्पर्श दर्शन घेता आले. त्यामुळे आनंदाचे वातावरण पसरले आहे.

पहाटे अभिषेक, पुजा

आज पहाटे आदिशक्ती मुक्ताबाईस मानाची अभिषेक पुजा, आरती संस्थानचे अध्यक्ष रविंद्र पाटील यांनी केली. यावेळी पुजारी विनायक व्यवहारे, व्यवस्थापक उद्धव जुनारे, वारकरी सेवा संस्थेचे पुरूषोत्तम वंजारी, निवृत्ती पाटील, गणेश अढाव व असंख्य भाविक उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

SCROLL FOR NEXT