मुंबई, पुणे, ठाणे, रायगड परिसर अंमली पदार्थांचा ‘सेन्सिटीव्ह बेल्ट'

देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या अंमली पदार्थ तस्करांकडून पश्‍चिम पट्ट्यातील पुण्यासह मुंबई, ठाणे, रायगडवर अधिक लक्ष केंद्रित करून आपले जाळे मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे
अंमली पदार्थ तस्करांकडून पश्‍चिम पट्ट्यातील पुण्यासह मुंबई, ठाणे, रायगडवर अधिक लक्ष केंद्रित करून आपले जाळे मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे
अंमली पदार्थ तस्करांकडून पश्‍चिम पट्ट्यातील पुण्यासह मुंबई, ठाणे, रायगडवर अधिक लक्ष केंद्रित करून आपले जाळे मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे- Saam TV
Published On

क्षिण अमेरिकेतून South America कोकेन, भारताच्या उत्तरेकडील राज्यांमधून ब्राऊन शुगर, अफीम, तर दक्षिणेकडील राज्यांमधून गांजा अशा प्रकारे सध्या परदेशासह देशाच्या कानाकोपऱ्यातून अमली पदार्थ महाराष्ट्रात Maharashtra सर्रासपणे येत आहेत. विशेषतः पश्‍चिम पट्टा हा अमली पदार्थ तस्करांसाठीचा Smugglers ‘सेन्सीटीव्ह बेल्ट’ ठरू लागल्याचे धक्कादायक चित्र आहे. ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे पश्‍चिम पट्ट्यातील मुंबई, पुणे Mumbai Pune सारख्या शहरातील उच्चभ्रू तरुण, नोकरदार, सेलिब्रेटीपर्यंत वेगवेगळे व महागडे ‘ड्रग्ज’ पोचविण्यात तरबेज आहे. Mumbai Pune Sensitive belt for Contraband Substances

राज्यात येणाऱ्या अमली पदार्थांमध्ये दक्षिणेकडील राज्यांमधून गांजा, एलएसडी स्टॅम्प तर उत्तरेकडील काही राज्यांमधूनही ब्राऊन शुगर, कोकेन, अफीमसारखे अमली पदार्थ पोचविले जातात तर परदेशातून येणारा मेफेड्रोन (एमडी) सारखा अमली पदार्थ मुंबईमार्गे पुण्यात दाखल होतो. अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी यापुर्वी केलेल्या कारवाईतून हे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या अमली पदार्थ तस्करांकडून पश्‍चिम पट्ट्यातील पुण्यासह मुंबई, ठाणे, रायगडवर अधिक लक्ष केंद्रित करून आपले जाळे मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे.

अंमली पदार्थ तस्करांकडून पश्‍चिम पट्ट्यातील पुण्यासह मुंबई, ठाणे, रायगडवर अधिक लक्ष केंद्रित करून आपले जाळे मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे
धक्कादायक! Shahrukh Khanला भेटाण्यासाठी आर्यनलाही लागते परवानगी; पाहा Video

महाविद्यालयीन तरुण ‘टार्गेट’

शहरांमधील तरुणाईची वाढती संख्या लक्षात घेऊन गेल्या काही वर्षात अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळ्यांकडून त्यांना ‘टार्गेट’ केले जाते. अन्य राज्यांमधून अमली पदार्थ छुप्या पद्धतीने महाराष्ट्रात आणून विक्रीसाठी मुंबई पाठोपाठ पुण्याला प्राधान्य दिले जाते. शहरातील उच्चभ्रूच व्यक्ती, तरुणांना अमली पदार्थांच्या जाळ्यात ओढले जाते. तसेच शहराच्या वेगवेगळ्या भागात होणाऱ्या पार्ट्यांमध्येही मागणीनुसार अमली पदार्थ पोचविण्याचे काम ‘ड्रग्ज पेडलर’कडून केले जात आहे. Mumbai Pune Sensitive belt for Contraband Substances

कोट्यवधींचे अमली पदार्थ जप्त

पुणे पोलिसांच्या खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकासह पोलिस ठाणे, गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडून अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांवर ‘वॉच’ ठेवून कारवाई केली जाते. पुणे पोलिसांनी २०१९ मध्ये सव्वा दोन कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करून १०९ जणांना अटक केली आहे. तर २०२० मध्ये ८३ लाखांचे अमली पदार्थ जप्त करून ६७ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये महिलांचाही सक्रिय सहभाग आहे.

.... असा होतो प्रवास

अमली पदार्थ तस्करांकडून या कामासाठी खासगी वाहनांचा वापर टाळला जातो. त्यांच्याकडून फळे, पालेभाज्या, धान्य यांसारख्या जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणारे ट्रक, प्रवासी जीप, कार, खासगी ट्रॅव्हल्स, एसटी बसचा वापर केला जातो. Mumbai Pune Sensitive belt for Contraband Substances

पश्‍चिम पट्ट्यातील मुंबई, पुणे, ठाणे, रायगड हा अमली पदार्थ तस्करांचा ‘सेन्सिटीव्ह बेल्ट' झाला आहे. परदेशातून, देशाच्या वेगवेगळ्या भागासह महाराष्ट्रातूनही अमली पदार्थ या भागात येतात. महाराष्ट्रात काही ठिकाणी अमली पदार्थांच्या फॅक्‍टरी असून त्याद्वारेही अमली पदार्थ सगळीकडे पोचविले जात असल्याचे कारवाईमध्ये आढळले आहे, अशी माहिती नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिली आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com