Jalgoan Medical Collage Saam tv
महाराष्ट्र

वर्षभरापासून त्रस्त मुलाचा आजार झाला बरा; आनंदी बापाने वाटले पेढे!

वर्षभरापासून त्रस्त मुलाचा आजार झाला बरा; आनंदी बापाने वाटले पेढे!

संजय महाजन

जळगाव : पोट दुखतंय म्हणून मुलगा सारखा त्रस्त.. बापाच्या दवाखान्यामध्ये मुलाला घेऊन सारख्या चकरा..खाजगी दवाखान्यात वर्षभर फिरले.. शेवटचा पर्याय म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आले. डॉक्टरांनी (Doctor) आशा पल्लवित केल्या. अखेर सव्वा महिन्यानंतर मुलगा पूर्णपणे ठणठणीत बरा झाला. हर्षोल्हासित मुलाच्या बापाने रुग्णालयाच्या (Hospital) वार्डात पेढे वाटले. त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून डॉक्टरांना देखील समाधानाचे अश्रू आले. (jalgaon news medical collage child who had been suffering for a year was cured)

आकाश प्रल्हाद बरडवाल (वय १४, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे बरे झालेल्या रुग्ण मुलाचे नाव आहे. त्याला वर्षभरापूर्वी पोटात दुखत असल्यामुळे वडिलांनी खाजगी दवाखान्यात नेले होते. मात्र अनेक दवाखान्यात गेल्यावर देखील मुलाला गुण येत नव्हता. त्याच्या तक्रारी सुरूच होत्या. त्यामुळे बरडवाल कुटुंब यामुळे त्रस्त होते. अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (Jalgaon Medical Collage) येथे ९ फेब्रुवारी रोजी आकाशला उपचारासाठी दाखल केले.

सुरवातीला येथेही निदान सापडेना

त्या ठिकाणी शल्यचिकित्सा विभागाच्या डॉक्टरांनी आकाशला तपासले. त्यांनाही सुरुवातीला निदान होईना, पंधरा दिवस निगराणीखाली ठेवल्यानंतर त्याचे सोनोग्राफी करण्याचे ठरले. सोनोग्राफीमध्ये प्लिहातील पांथरीच्या गाठीमध्ये दोष आढळला. त्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. गाठ काढली नसती तर त्याच्या जीवाला धोका होता. शस्त्रक्रिया करून पांथरीची सुमारे साडेचार किलोची गाठ काढून टाकण्यात आली. त्यानंतर आकाशला डॉक्टरांनी निगराणीखाली ठेवले. सव्वा महिन्यानंतर मंगळवारी २२ मार्चला अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते आकाशला डिस्चार्ज कार्ड व पुष्पगुच्छ देऊन रुग्णालयातून निरोप देण्यात आला. उपचार व शस्त्रक्रिया करण्याकामी शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख तथा उपअधिष्‍ठाता डॉ. मारुती पोटे, डॉ. संगीता गावित यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. समीर चौधरी, डॉ. विपीन खडसे, डॉ.प्रज्ञा सोनवणे, बधिरीकरण शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संदिप पटेल, डॉ. अनिल पाटील यांच्यासह शस्त्रक्रिया गृहाचे इन्चार्ज सिस्टर नीला जोशी, कक्ष ७ च्या इन्चार्ज सिस्टर सुरेखा महाजन, सविता बिऱ्हाडे, नीता दुसाने, विकास धनगर, जयश्री कोंबे, सविता जायभाय, रत्ना बारेला आदींनी परिश्रम घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk Food Combinations: दुधासोबत कोणते पदार्थ खाल्याने Acidityची समस्या वाढते?

Cancer: महिलांच्या शरीरात हे बदल दिसले तर समजा कॅन्सर झालाय

Maharashtra Live News Update : वर्ध्यात सामान्य रुग्णालयात आग!

Maharashtra Politics: पुण्यात भाजपनं पुन्हा खिंडार पाडलं, मविआचे अनेक दिग्गज नेते हाती घेणार 'कमळ'

महायुतीत जिथं ज्याचं बळ, तिथं स्वबळ? निकालानंतर बदललं बार्गेनिंग पॉवरचं गणित?

SCROLL FOR NEXT