Jalgaon ZP Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: घरकुल योजनेत कमी काम; दोन ग्रामसेवक निलंबित

घरकुल योजनेत कमी काम; दोन ग्रामसेवक निलंबित

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : पंचायत समिती धरणगाव येथे गुरुवार (25 ऑगस्ट) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया (Pankaj Aashiya) यांनी आढावा सभा घेतली. यात स्वछ भारत मिशन आणि घरकुल योजनेत कमी काम आढळून आलेल्या बोरगाव व वाघळूद येथील ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. (Jalgaon News Two Gramsevak suspended)

धरणगाव (Dharangaon) येथे जळगाव जिल्‍हा परिषदेचे (Jalgaon ZP) मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते. या आढावा सभेत उपस्थित झालेले मुद्दे व दप्तरात आढळून आलेल्या दिरंगाईमुळे आर. डी. पवार व बी. डी. बागुल या दोघा ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

१७ ग्रामपंचायतींची सखोल तपासणीचे आदेश

धरणगाव तालुक्यातील नांदेड, जाबोरे, रेल, सोनवद, चालखेडा, दोनगाव, वराड येथील येथील ग्रामपंचायत दप्तराची सखोल तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जळगाव तालुक्यातील उमाळे, पाथरी, शेळगाव, कुसुबा, वावडडे, वडली, सुभाषवाडी, जवखेडे, वराड, बेडी येथील ग्रामपंचायत दप्तराची सखोल तपासणी करण्याचे आदेश देखील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT