कोजागिरी 
महाराष्ट्र

कोजागिरी : अतिरिक्त दोन लाख लिटर दुधाची मागणी

कोजागिरी : अतिरिक्त दोन लाख लिटर दुधाची मागणी

Rajesh Sonwane

जळगाव : कोरोना संसर्ग कमी झाल्याने यंदा कोजागरी पौर्णिमा साजरी करता येत आहे. त्यामुळे दुधाची मोठी मागणी आहे. यात जिल्हा दूध संघाच्यावतीने अतिरिक्त दुधाचे नियोजन केले आहे. दुधाच्या एका लिटरला 60 ते 70 रुपये दर आहे. (jalgaon-news-Kojagiri-Demand-for-additional-two-lakh-liters-of-milk)

कोजागिरी पौर्णिमा आज (ता.19) साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने दूध बाजारात दुधाची खरेदी- विक्री मोठ्या प्रमाणात होते. शहरातील मिठाई विक्रेते, किरकोळ विक्रेते; तसेच केटरिंग व्यावसायिक दूध बाजारातून खरेदी करतात. गतवर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे सार्वजनिक ठिकाणी कोजागरी पौर्णिमा साजरी करण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे अनेकांच्या उत्साहावर विरजण पडले. मात्र गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे यंदा कोजगिरी साजरी करता येणे शक्य आहे. परिणामी दुधाला मागणी वाढली आहे.

मागणीनुसार दूधाचा पुरवठा

जिल्हा दूध संघांकडून नियमित दीड लाख लीटरचा पुरवठा केला जातो. कोजागिरीच्या पार्श्वभूमिवर बाहेरील जिल्हयांमधून दूधाची मागणी असल्याने दूध संघांकडून अतिरिक्त दोन लाख लीटर दूधाचा पुरवठा केला जाणार आहे. मागणीनुसार दूधाचा पुरवठा केला जाणार आहे.

खासगी डेअरी चालकांकडून वाढीव मागणी

जिल्हा दूध संघासह खासगी डेअरी चालकांनी देखील अतिरिक्त दुधाचे नियोजन केले आहे. शहरातील खाजगी डेअरींमध्‍ये दररोज साधारणपणे १ हजार लिटर दुधाची विक्री होत असते. मात्र कोजागरी निमित्ताने ही मागणी दीडपट अधिक होत असते. यामुळे खाजगी डेअरीमधून देखील तीन हजार लिटरपर्यंत दुधाचा अतिरिक्त पुरवठा करण्यात येणार असल्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT