Child death 
महाराष्ट्र

अखेर त्‍या चिमुकल्‍याची झुंज अपयशी

अखेर त्‍या चिमुकल्‍याची झुंज अपयशी

साम टिव्ही ब्युरो

भुसावळ (जळगाव) : तालुक्यातील खंडाळा येथील महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर महिलेच्या दोघा मुलांनादेखील विषबाधा झाल्याचे समोर आले होते. यापैकी मोठा मुलगा श्रेयस याचा नाशिक येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. आईच्या मृत्यूनंतर पाच दिवस मृत्यूसोबत सुरू असलेली श्रेयसची झुंज अपयशी ठरली. (jalgaon-news-khandala-village-mother-death-after-nine-year-old-boy-death)

खंडाळा येथील अश्विनी चौधरी या विवाहितेने घरात कोणीही नसताना बुधवारी (ता. २५) सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेच्या काही वेळाने तिची दोन्ही मुले अनुक्रमे प्रणव (वय ३) आणि श्रेयस (वय ९) या दोघांना विषबाधा झाल्याचे समोर आले होते. यानंतर त्यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. तेथे उपचाराअंती प्रणवच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने सुटी झाली.

सुधारणा होवून प्रकृती पुन्‍हा खालावली

श्रेयसच्या शरीरात जास्त प्रमाणात विष पसरल्याने उपचार सुरू होते. येथे त्याच्या प्रकृतीत दोन दिवसांनंतर काहीशी सुधारणा झाली होती. मात्र, त्याची प्रकृती अचानक खालावली. यामुळे सोमवारी त्याला जळगावहून नाशिक येथील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. तेथे त्याने शेवटचा श्वास घेतला. यानंतर सोमवारी रात्रीच मृतदेह गावी खंडाळा येथे आणून अंत्यविधी करण्यात आले. श्रेयसच्या मृत्यूप्रकरणी नाशिक येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तेथून कागदपत्रे आल्यावर भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद होईल. या प्रकरणाच्या तपासात समोर येणाऱ्या माहितीनुसार पुढील प्रक्रिया ठरेल, असे पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Natural BP Control : उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी जीवनशैलीत काय बदल करावेत?

Maharashtra Live News Update: खारघरमध्ये माजी नगरसेविकांचं ठिय्या आंदोलन

Wheat Chocolate Cake: मैदा नाही तर गव्हाच्या पीठापासून मुलांसाठी बनवा हेल्दी चॉकलेट केक, वाचा सोपी रेसिपी

Nagpur : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यानं कारागृहातच स्वत:ला संपवलं, अंतर्वस्त्रानंच....

Akola Crime : धक्कादायक! अकोल्यात एमडी ड्रग्स तस्करी; आरोपीचं वंचित बहुजन आघाडीचं कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT