श्रीराम रथोत्‍सव 
महाराष्ट्र

रामनामाचा गजर..जळगाव ग्रामनगरीत श्रीराम रथोत्‍सवाचा उत्‍सव

रामनामाचा गजर..जळगाव ग्रामनगरी दुमदुमली

Rajesh Sonwane

जळगाव : ‘प्रभू सियावर रामचंद्र की जय..’ च्या जयघोषात व मोजक्‍याच भाविकांच्या मांदियाळीत आज श्रीराम रथोत्सव साजरा होत आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त श्रीराम मंदिर संस्थानतर्फे दरवर्षाप्रमाणे रथोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून रथोत्‍सवाला दीड शतकी परंपरा लाभलेली आहे. (jalgaon-news-kartik-ekadashi-shriram-rathotsav-will-celebrate)

कोरोनामुळे गतवर्षी श्रीराम रथोत्सव उत्सव साजरा होऊ शकला नव्हता, तो यंदा मर्यादित स्वरुपात साजरा होत आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त रथाची मिरवणूक निघेल परंतु, बारा तासांची मिरवणुक यंदा सहा तासांचीच होणार आहे. रथोत्सवाचे यंदा १४९ वे वर्ष आहे. आज पहाटे चारला काकडारती, प्रभु श्रीरामांच्या उत्सवमूर्तीस महाभिषेक, सकाळी सात महाआरती, ७.३० ते ८.३० सांप्रदायिक पंचपदी भजन, तर मंदिराच्या प्रांगणात सकाळी १०.३० वा. गादीपती हभप मंगेशमहाराज जोशी यांच्याहस्ते विधीवत रथाचे पूजन होऊन रथ मिरवणुकीला सुरवात होईल.

तरी दर्शनासाठी गर्दी

शतकोत्तर परंपरा असलेला श्रीराम रथोत्सव कार्तिकी एकादशीला गर्दी व वेळेची मर्यादा पाळून साजरा होत आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही नियम घालून दिले. परंतु, गतवर्षी रथोत्‍सव साजरा न झाल्‍याने यंदा दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. परंतु, अधिक गर्दी होवू नये याकरीता पोलिस प्रशासन येथे तैनात आहे.

उपरस्‍ते, मार्ग बंद

रथमार्गाची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी, प्रशासनाने उत्सवाला काही नियम घालून देत परवानगी देण्याचे मान्य केले. रथोत्सव मर्यादित स्वरूपात साजरा करण्याचे नियोजन केले असून त्याअनुषंगाने गर्दी होऊ नये याचे व्यवस्थापन व नियोजन केले आहे. त्‍यादृष्‍टीने रथाच्‍या मार्गावरील उपरस्‍ते व मार्ग बंद ठेवण्यात येणार आहेत.

या मार्गाने जाणार रथ

श्रीराम मंदिरापासून मिरवणूक निघून कोल्हेवाडा, आंबेडकर नगर, चौधरीवाडा, तेली चौक, मंदिराच्या मागची गल्ली, बोहरा गेल्ली, सुभाष चौक दाणाबाजार, पीपल्स बँक, शिवाजीरोड, नेवे ब्रदर्स, घाणेकर चौक, गांधी मार्केट, सुभाष चौक, सराफा बाजारातील श्री महालक्ष्मी मंदिर, मरिमाता मंदिर, भिलपुरा मार्गे येताना लालशा बाबांच्या समाधीवर पुष्पचादर अर्पण करुन, दधिची चौक, बालाजी मंदिरमार्गे मिरवणूक रथचौकात येईल. यंदा वेळेची मर्यादा घालून देण्यात आली असून भक्तांनी लांबूनच रथाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nora Fatehi Accident: मोठी बातमी! बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात

Navi Mumbai Politics: शरद पवार गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Election: भाजपची इन्कामिंग एक्सप्रेस सुसाट,पुण्याचे माजी महापौर हाती घेणार कमळ?

Sunday Horoscope : जिवनाचं खरं सार्थक होणार; ५ राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार

अकोल्याच्या बाळापूर नगरपरिषदेवर कुणाचं वर्चस्व असणार? 'वंचित' सत्ताधाऱ्यांना धक्का देणार?

SCROLL FOR NEXT