Jayant Patil Saam tv
महाराष्ट्र

Jayant Patil News: सरकार घोषणा करतं पण मदत मिळत नाही; जयंत पाटील यांचा सरकारवर निशाणा

Jalgaon News : अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन मदत मिळावी. पीक विमा कंपन्या विमा द्यायला टाळत आहेत

संजय महाजन

जळगाव : जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आले तेव्हा आमचं सरकार धावून गेलं, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तांत्रिक गोष्टींमध्ये सरकारने अडकु नये. शेतकऱ्यांना (Farmer) विम्याची रक्कम मिळायला पाहिजे, अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन मदत मिळावी. पीक विमा कंपन्या विमा द्यायला टाळत आहेत. राज्यातील हे सरकार केवळ घोषणा करते पण मदत मिळत नाही, आजवर सरकारचा हा वाईट अनुभव आला आहे. शेतकऱ्यांना सरकारने मदत द्यावी म्हणून आक्रोश मोर्चा काढला जात असल्याची (NCP) प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते (Jayant Patil) जयंत पाटील यांनी दिली. (Tajya Batmya)

शेतकऱ्यांना कापसाला दर (Cotton Price) मिळावा, किमान मागच्या वर्षाचा दर कपाशीला द्यावा. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आक्रोश मोर्चा काढण्यात येत असून यानिमित्ताने जळगावात आले असता जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. 


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सरकारने केवळ इव्हेन्ट व घोषणा केल्या 

मागच्या वर्षी जो भाव कापसाला मिळाला होता, तो भाव यंदा देखील मिळायला पाहिजे. आज शेतकऱ्यांची कुचंबना होत आहे. त्यात कापूस उत्पादक, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे. सरकारने इव्हेंट आणि घोषणा करण्याव्यतिरिक्त काहीही केलेले नाही. शेतकऱ्यांची भूमिका मांडण्यासाठी आज राष्ट्रवादी जन आक्रोश मोर्चा काढत आहे. सरकारने चढ्या दराने कापूस खरेदी करावी, निर्यात करायला पाहिजे, त्यासाठी केंद्र सरकारने भूमिका घ्यायला हवी. सरकारने कापसाला अनुदान दिलं पाहिजे; असेही ते यावेळी बोलले. 

बावनकुळे यांनी चार तालुक्यात मंत्री करण्याची गरज म्हणजे परिस्थिती बिकट आहे. एका बाजूने शिंदे आमचे आगामी काळातही नेते असतील आणि दुसरीकडे भाजपचाच मुख्यमंत्री असेल, असं सांगतात. म्हणजेच मित्र पक्षाचं अस्तित्व त्यांना मान्य नाही; असे मतही जयंत पाटील यांनी मांडले. अडीच वर्षात काहीच झालं नाही तो राजकीयदृष्ट्या सांगितलं जातं, आजही महाविकास आघाडीची लोकप्रियता कायम आहे. हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून शासन आपल्या दारी योजना म्हणजे इव्हेंट केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

Maharashtra Assembly Election 2024: सावधान! मतदानासंदर्भात दिशाभूल करणारे संदेश पाठवाल तर होईल कडक कारवाई

SCROLL FOR NEXT