Jalgaon News Marriage
Jalgaon News Marriage Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: मंडपात ती बापाला शोधत होती पण..; मुलीच्‍या डोक्‍यावर अक्षदा पडण्यापुर्वीच घडले अघटित...

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मुलीच्या लग्नाचा तडवी कुटुंबियांना मोठा आनंद होता. मात्र तडवी कुटुंबियांचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. मुलीला हळद लागली; सर्व नातलग रात्री नाचत होते अन्‌ झटक्‍यात (Jalgaon News) सर्व आनंदावर विरजण पडले. मुलीच्‍या डोक्‍यावर अक्षदा टाकण्यापूर्वीच बापाने जगाचा निरोप घेतला. (Breaking Marathi News)

जामनेर तालुक्यातील मांडवे खु. अरुण कासम तडवी (वय ५०) हे कुटुंबासह वास्तव्यास होते. मजुरी करुन कुटुंबांचा उदरनिर्वाह करत होते. तडवी यांची दुसरी मुलगी हिना हिच्‍या (Marriage) लग्नाची तयारी पूर्ण झाली होती. शनिवारी हळदीचा कार्यक्रम होता. हळदीच्या कार्यक्रमानंतर हिना हिचाही गावात बीदचा कार्यक्रम सुरु होता. या बीद कार्यक्रमात नाचत असताना अरुण तडवी यांना हृदयविकाराचा झटका आला. तडवी यांना तातडीने तोंडापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तोपर्यंत अरुण तडवी यांची प्राणज्योत मालवली होती.

अक्षदा पडल्‍या तरी बाप दिसला नाही..

वडील अरुण तडवी यांचा मृत्यू झाल्याची बातमी तिच्यापासून लपवून ठेवण्यात आली होती. परंतु, बापाच्या प्रतिक्षेत हिना हिने कशीबशी रात्र काढली. मात्र रात्र उलटूनही दुसऱ्या दिवशी बाप दिसत नव्हता. आनंदाच्या क्षणात बाप कुठे दिसत नसल्याने हिनाला शंका आली. तिने अनेकांना विचारपूस केली, मात्र सर्वांकडून तिची समजूत काढली जात होती.

मंडपातच आक्रोश

सकाळी लवकर लग्न उरकले. सर्वांनी अक्षदा टाकल्या; तरी बाप दिसला नसल्याने हिना कासावीस झाली. अखेर तिला खरं काय ते सांगण्यात आले. बापाच्या मृत्यूची बातमी ऐकताच हिनाने हंबरडा फोडला. हिनाचा आक्रोश बघून लग्न सोहळ्याला उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले होते. मुलीच्या लग्न आटोपताच काही तासातच त्याच ठिकाणी बापाची अंत्ययात्रा निघाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

SCROLL FOR NEXT