जामनेर (जळगाव) : शहरातील हनुमान मंदीरासमोर भारतीय जनता पार्टीच्यावतीने माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात शहरातून ढोल टाळ व शंखनाद करून रॅली काढली. यानंतर घंटानाद आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच घंटानाद करत आमदार गिरीश महाजन यांनी हनुमान मंदिराचे दरवाजा उघडत आत प्रवेश केला. (jalgaon-news-jamner-bjp-ghantanad-and-The-temple-was-opened-by-Girish-Mahajan)
कोरोनात बंद केलेली मंदिर अजून देखील उघडलेली नाही. या उलट सर्व कार्यक्रम, डान्सबार, बिअरबार खुली केली. परंतु, मंदिर उघडायला परवानगी दिलेली नाही. या विरोधात भाजपने आज राज्यभरात आंदोलन छेडले आहे.
आम्हीच मंदिरे उघडणार
महाराष्ट्र राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना मोठमोठे कार्यक्रम घेतात. राज्यातील डान्सबार, बिअरबार, बाजारपेठ, मॉल, सिनेमा थेटर सर्व चालू आहे. तसेच अन्य राज्यात मंदिरे उघडे आहे. मग महाराष्ट्रात का नाही. फक्त महाराष्ट्रातील मंदिरातच कोरोना येतो का? असा सवाल आमदार गिरीश महाजन यांनी यावेळी केला. त्यामुळे आता भारतीय जनता पार्टी कोणतेही नियमाला घाबरणार नसून तुम्ही पोलिस उभे करा; आम्ही आजपासून राज्यातील मंदिरे उघडे करू अशी प्रतिक्रिया महाजन यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
शंखनाद करून काढली रॅली
जामनेर शहरातील भाजीमंडी भागातील हनुमान मंदिरासमोर आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने घंटानाद आंदोलन केले. यावेळी शहरातून भाजपातर्फे ढोल टाळ व शंखनाद करून रॅली काढण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगरपालिका गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, नगरसेवक नाना बाविस्कर, नाना वाणी, सुहास पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.