जळगाव : राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये सोबत असलेल्या राष्ट्रवादीने शिवसेनेविरोधात आंदोलन छेडले आहे. जळगावातील खड्ड्यात गेलेल्या रस्त्यांसाठी राष्ट्रवादीने महापालिकेसमोर जनआंदोलन करत ठिय्या मांडला आहे. (NCP raised voice against Shiv Sena; Demand for resignation of Shiv Sena mayor)
राष्ट्रवादी काँग्रेस महानगरतर्फे जळगाव शहरातील खड्डे बुजविण्यासाठी व जनतेला हाडांच्या त्रासापासून वाचण्यासाठी जन आंदोलन करण्यात आले. रस्त्यांच्या मागणीसाठी महापौर, आयुक्तांसोबत आमदार सुरेश भोळे यांच्या विरूद्धच्या घोषणाबाजीने राष्ट्रवादी आवाज उठविला. राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या महापौर व मनपा आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
भाजपनंतर शिवसेनेचे होते आश्वासन
जळगाव महापालिकेत २०१८ मध्ये भाजपने बहुमताने सत्ता मिळविली. त्यावेळी आमदार गिरीश महाजन यांनी वर्षभरात जळावाचा कायापालट करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, त्यांनी काही केले नाही. आता सहा महिन्यांपुर्वी शिवसेनेचे महापौर झाले. त्यांनी देखील पावसाळ्यानंतर शहरात रस्त्यांची कामे सुरु होतील तोपर्यंत माती टाकुन रस्त्यावरील खड्डे बुजणार असे महापौरांनी आश्वासन दिले होते. त्यांनी देखील काहीही उपाययोजना केली नसल्याने राष्ट्रवादीने शिवसेनेविरोधात आवाज उठविला आहे. यावेळी विभागीय अध्यक्षा कल्पना पाटील, महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, शहर युवक अध्यक्ष स्वप्निल नेमाडे, शहर सरचिटणीस अँड. कुणाल पवार, रोहन सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.