Jalgaon News Heat Wave Saam tv
महाराष्ट्र

Heat Wave: जळगावचे तापमान ४७ अंश पार; सलग चार दिवसांपासून सर्वांत हॉट

जळगावचे तापमान ४७ अंश पार; सलग चार दिवसांपासून सर्वांत हॉट

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जिल्ह्यात ‘अल निनो’ च्या प्रभावामुळे सलग चौथ्या दिवशी जळगाव जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक ‘हॉट’ ठरतोय. वेलनेस वेदर या खासगी संस्थेने (Jalgaon) जळगावचे कमाल तापमान तब्बल ४६.७ अंश तापमानाची (Tempreture) नोंद केली आहे. तर ममुराबादच्या शासकीय हवामान केंद्रात जळगावच्या कमाल तापमानाचा पारा ४५ अंश नोंदला गेला. (Maharashtra News)

जळगाव जिल्ह्यात आठवड्यापासून तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे. गेल्या चार दिवसांत तर कमाल तापमानाची विक्रमी नोंद झाली. केवळ आठवड्याभरात कमाल तापमानातील फरक ७ ते ८ अंशांवर पोचला असून, त्यामुळे नागरिक या उष्म्यात अक्षरश: होरपळून निघत आहेत. जळगावसह जिल्ह्यातील शहरांचे गेल्या (Jalgaon Tempreture) आठवड्यापासून तापमान ४३ ते ४४.९ अंशांवर नोंदले जात आहे. शनिवारी जळगावचे कमाल तापमान ४५ अंश नोंदले गेले, तर वेलनेस वेदर या खासगी एजन्सीच्या दाव्यानुसार जळगावचे कमाल तापमान ४७.२ अंश होते. दुपारी तीन ते पावणे चार दरम्यान ४८.५ अंश तापमान असल्याची जाणीव होत होती.

जिल्‍ह्यात सर्वत्र पारा ४५ पार

भुसावळ, वरणगाव, चोपडा या शहरांमध्येही कमाल तापमानाचा पारा ४६ अंशांवर पोचला आहे. तापमान वाढीमुळे शहरासह जिल्ह्यातील रस्ते र्निमनूष्य होताहेत. महामार्गावरील वाहतूकही दुपारी थांबलेली दिसते. अनेक वाहनधारक महामार्गा शेजारी असलेल्या झाडाच्या सावलीत थांबलेली दिसतात. तर तापमानातील वाढीचा पक्षांवरही परिणाम झाला आहे. दुपारी बारापासूनच कावळे, कबुतर, चिमण्या आदी पक्षी दिसेनासे होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update:विमानाच्या इंधन टाकीतून गळती; १६६ प्रवाशांनी भरलेल्या विमानाचं तात्काळ लँडिंग

Acidity: अ‍ॅसिडिटीला त्रासलात? तर करा 'हे' सोपे घरगुती उपाय, मिळेल आराम

मोठी बातमी! रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?

नवीन व्यवसाय सुरू कराल, भाऊबीजेला नातेबंध आणखी पक्के होईल; ५ राशींच्या लोकांसाठी स्मरणात राहणारा दिवस ठरणार

आम्ही किंगमेकर आहोत...'; टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांची कारच्या टपावर बसून हुल्लडबाजी; पोलीस काय कारवाई करणार?

SCROLL FOR NEXT