Jalgaon Pune Flight Service Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Pune Flight Service : जळगाव- पुणे विमानसेवा होणार सुरू; तिकीट बुकिंग झाली सुरु

jalgaon News : सात वर्षांपूर्वी जळगावातून व्यावसायिक विमान सेवेला सुरुवात झाली होती. उद्घाटनाच्या वेळी जळगावातून पुण्यासाठी विमानसेवा सुरु करण्याबाबत तत्कालिन कंपनीने घोषणा केली

संजय महाजन

जळगाव : जळगावला विमानराळ झाल्यानंतर आतापर्यंत मुंबईसाठी उड्डाण झाले होते. मात्र ही विमानसेवा देखील काही कारणात्सव खंडित झाली. शिवाय पुणे, अहमदाबादसाठी विमान सेवा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु होते. यानंतर आता जळगाव ते पुणे या विमानसेवेची अखेर येत्या आठवड्यात ट्रायल फ्लाइट उड्डाण भरणार आहे. यामुळे पुणे जाणाऱ्यांसाठी सोयीचे होणार आहे. 

सात वर्षांपूर्वी जळगावातून व्यावसायिक विमान सेवेला सुरुवात झाली होती. उद्घाटनाच्या वेळी जळगावातून (Jalgaon) पुण्यासाठी विमानसेवा सुरु करण्याबाबत तत्कालिन कंपनीने घोषणा केली होती. जळगाव विमानतळावरून सेवा पुरवणाऱ्या कंपनीने शुक्रवारी या अतिरिक्त व प्रायोगिक तत्वावरील विमानसेवेची अधिकृत घोषणा केली आहे. त्यानुसार जळगावातून २४ व २५ मे रोजी ट्रायल फ्लाइट उड्डाण घेतील. (Flight) विमानसेवा पुरवणाऱ्या 'फ्लाय ९१' या कंपनीने २४ मे रोजी या ट्रायल फ्लाइटचे नियोजन केले.

दोन्ही दिवशी दुपारी २ वाजून १० मिनिटांनी पुण्यासाठी फ्लाइट उड्डाण भरेल ते पुण्यात ३ वाजून २५ मिनिटांनी लैंड होईल. तर अर्ध्या तासाने ही फ्लाइट परतीसाठी पुण्यातून ३ वाजून ५५ मिनिटांनी उड्डाण भरून जळगावात ५ वाजून २० मिनिटांनी लँड होईल. यासाठी आतापासून तिकीट विक्री सुरु केली आहे. अर्थात पुणे (Pune) जाणाऱ्यांसाठी अवघ्या तासाभराचा हा विमान प्रवास राहणार असल्याचे येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी विमानसेवा सोयीची ठरणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Muslim reservation : मोठी बातमी! मुस्लिम समाजाचे आरक्षण रद्द, फडणवीस सरकारचा निर्णय

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे? जाणून घ्या कारणं

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

Success Story: दोनदा UPSC क्रॅक; आधी IPS मग IAS; तिसऱ्यांदा लग्न करणारे IAS अवि प्रसाद आहे तरी कोण?

Gaming Jihad: दहशतवाद्यांचा 'गेमिंग' जिहाद; मुलांना कट्टरपंथी बनवण्याचा नवा डाव

SCROLL FOR NEXT