Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Politics : जळगाव जिल्ह्यात नाराजांची बंडखोरी; भाजपचे तीन, अजित पवार गटाकडून एकाची अपक्ष उमेदवारी

Jalgaon News : महायुती व महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटप करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. विधानसभेसाठी इच्छुकांची संख्या अधिक असून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराज झाले आहेत

संजय महाजन

जळगाव : विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी नाराजीनाट्य पाहण्यास मिळत आहे. यामुळे बहुतांश ठिकाणी अपक्ष उमेदवारी करत बंडखोरी केली जात आहे. जळगाव जिल्ह्यात देखील पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले भाजपचे पदाधिकारी बंडखोरी करणार असून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात राष्ट्रवादी अजित पवार गटातील देखील एक इच्छुक उमेदवार आहे. 

महायुती (Mahayuti) व महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटप करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. विधानसभेसाठी इच्छुकांची संख्या अधिक असून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराज झाले आहेत. यामुळे बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी नाराजांकडून करण्यात येत असल्याचे राज्यात पाहण्यास मिळत आहे. हेच चित्र (Jalgaon) जळगाव जिल्ह्यात देखील पाहण्यास मिळत असून यात प्रामुख्याने महायुतीतील नाराज असलेल्या चार जणांकडून अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. 

जळगाव, पारोळा, अमळनेरमध्ये बंडखोरी 

भाजपचे (BJP) पदाधिकारी बंडखोरी करणार असून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. यात जळगाव शहर मतदार संघ, पारोळा- एरंडोल मतदारसंघ तर अमळनेर मतदार संघ या ठिकाणी नाराज असलेले भाजपचे पदाधिकारी बंडखोरीच्या पावित्र्यात असून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. यामध्ये पारोळा- एरंडोल मतदारसंघात भाजपचे माजी खासदार ए. टी.नाना पाटील  पारोळा - एरंडोल मतदार संघातून उमेदवारी अपक्ष अर्ज दाखल करणार आहे. तर याच मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे डॉ. संभाजी पाटील हे सुद्धा उमेदवारी न मिळाल्याने नाराज असून ते अपक्ष निवडणूक लढवणार आहे. दुसरीकडे अमळनेर मतदारसंघात भाजपचे माजी आमदार शिरीष चौधरी हे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. तर जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे महानगर उपाध्यक्ष तथा माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे हे उमेदवारी न मिळाल्याने नाराज असल्याने अपक्ष निवडणूक लढवणार आहे.

बंडखोरी खपवून घेतली जाणार नाही : गिरीश महाजन 
भाजपच्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाच्या नेत्यांच्या बंडखोरीमुळे जळगाव जिल्ह्यात फूट पडली असून विद्यमान उमेदवारांना त्याचा फटका बसणार असल्याची शक्यता आहे. यामुळे सर्वांची समजूत घालण्याचा प्रयत्न करणार असून कुठल्याही पद्धतीची बंडखोरी खपवून घेतली जाणार नाही. बंडखोरी करणाऱ्या कुठल्याही भाजपच्या पदाधिकाऱ्याची गय केली जाणार नाही; असा इशारा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indapur Exit Poll : इंदापूरमध्ये तुतारीचा आवाज घुमणार, एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना मोठा झटका

Maharashtra Exit Poll: नंदुरबार मतदारसंघातून विजयकुमार गावित होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: हातकणंगलेमधून काँग्रेसचे राजू आवळे होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Polls : राम शिंदे पराभवाचा वचपा काढणार की रोहित पवार पुन्हा आमदार होणार? एक्झिट पोल काय सांगतो?

Samosa Recipe: नाश्त्यासाठी १० मिनिटांत बनवा हॉटेलसारखा खुसखुशीत समोसा

SCROLL FOR NEXT