Congress Saam tv
महाराष्ट्र

महागाई मुक्त भारत आंदोलन; चोपड्यात काँग्रेसचे धरणे

महागाई मुक्त भारत आंदोलन; चोपड्यात काँग्रेसचे धरणे

संजय महाजन

जळगाव : देशातील वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. इंधनाच्या किंमती वाढत असल्याचे चित्र दिसत असल्याने वाढत्या महागाईच्या मुद्यावरुन काँग्रेस आक्रमक झाली. या महागाई विरोधात तसेच इंधन दरवाढ संदर्भात चोपडा शहर व ग्रामिण काँग्रेस (Congress) कमिटीच्यावतीने महागाई मुक्त भारतसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. (jalgaon news Inflation Free India Movement Congress hold on chopda)

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज (१ एप्रिल) सकाळी अकराला तहसील कार्यालयावर महागाई मुक्त भारतसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार अनिल गावीत यांना निवेदन देण्यात आले.

आठ वर्षांपासून महागाई वाढतेय

सन २०१४ पासून केंद्रात भारतीय जनता पार्टीचे (BJP) सरकार स्थापन झाले आहे. या सरकारचे नेतृत्व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) करत आहेत. परंतु गेल्या ८ वर्षापासून देशात सतत महागाई वाढत आहे. त्यामुळे सामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे. या कालावधीत देशात कोणतीही बेरोजगारी कमी न करता सतत महागाई वाढवून सामान्य जनतेची मोठ्या प्रमाणावर लुट केली जात आहे. सद्यस्थित इंधनाचे दर तर सतत वाढून गगनाला भिडलेले आहेत. त्याचा परिणाम इतर सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर जाताना दिसत आहेत. या विरोधात कॉंग्रेसने आंदोलन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fried Modak Recipe: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणरायासाठी बनवा खुसखुशीत स्वादिष्ट तळणीचे मोदक; वाचा सोपी रेसिपी

Mysterious Fort : सोनं-चांदीने भरलेल्या विहिरी! 'या' किल्ल्यातील गुप्त खजिन्याचं रहस्य आजही कायम

इबोलाचा उद्रेक; मृतांचा आकडा ३,००० च्या पार, WHO ने दिला मोठा इशारा

Kitchen Vastu Tips: घरातील किचनविषयी 5 महत्त्वाच्या गोष्टी ज्या प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होणार, ५ राशींची होणार चांदी; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT