जळगाव : इंदुरीकर महाराजांचे किर्तन म्हटले की अभंग अन् दृष्टांत सांगत मधूनच काही विनोद सांगून उपस्थीतांना हसवितात. परंतु, जळगावात आयोजित किर्तनात (Jalgaon News) वेगळेच झाले. किर्तन (Kirtan) सुरू असताना ‘हाई झुमकावाली पोर..’ या अहिराणी गाण्यावर लहान मुलाने ठेका धरला. इतकेच नाही तर इंदुरीकर महाराजांनी किर्तन थांबवून मुलाला स्टेजवर बोलावर नाचायलाय लावले. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ सध्या (Social Media) सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. (Letest Marathi News)
शाळेच्या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमात संपूर्ण विद्यार्थ्यांनी या गाण्यावर ठेका धरलेला होता. या गाण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की महाराष्ट्र आणि जगभरात प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या भर कीर्तनाच्या कार्यक्रमात एका चिमुकल्याने ‘झुमका वाली पोर’ गाण्यावर ठेका धरला.
अन् इंदुरीकरांनी डोक्याला हात मारला
चिमुकला कीर्तनात अगदी पहिल्याच रांगेत बसला होता. त्यामुळे इंदुरीकर महाराजांनी नृत्य करणं आणि गाणं म्हणण पाहिले. यानंतर इंदुरीकर महाराजांनी या चिमुकल्याला पाहिल्यानंतर त्यांनी त्या मुलाला स्टेजवर बोलावलं. त्यानंतर त्याला स्टेजवर गाणं म्हणून नाचायला सांगितलं. विशेष म्हणजे हा चिमुकला भर मंचावर बिनधास्त जावून महाराजांच्या बाजूला उभा राहत त्याने माईकसमोर गाणं म्हणत ठेका धरला. यावेळी इंदुरीकर महाराजांनी डोक्यावर हात ठेवला आणि कीर्तनाला उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
व्हीडीओ झाला व्हायरल
इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात. तसाच जळगावातील इंदुरीकर महाजाजांच्या कीर्तनातील हा सर्व प्रकार समोर बसलेल्यांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. चिमुकल्याचा इंदुरीकर महाराजांच्या बाजूला उभं राहून गाणं म्हणत नृत्य करण्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे इंदुरीकर महाराजांनीदेखील यातून सर्वांना आनंदच देण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडीओतून दिसून येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.