Jalgaon Rain 
महाराष्ट्र

जळगाव जिल्‍ह्यात दमदार पाऊस; सकाळपासून रिपरिप सुरू

जळगाव जिल्‍ह्यात दमदार पाऊस; सकाळपासून रिपरिप सुरू

संजय महाजन

जळगाव : साऱ्यांनाच अस्वस्थ करून सोडणाऱ्या पावसाने जळगाव जिल्ह्यात बऱ्याच भागात दमदार हजेरी लावली. यामुळे बळीराजा सुखावला आहे. काही प्रमाणात का होईना.. पिक हाती लागणार म्हणून समाधान व्यक्त केले जात आहे. (jalgaon-news-Heavy-rains-in-Jalgaon-district-and-orange-alert)

जुन महिन्‍यात झालेल्‍या पावसात जळगाव जिल्‍ह्यातील बराच भाग कोरडा राहिला होता. काही ठिकाणी पेरणी होईल इतकाच पाऊस झाला होता. मात्र पेरणी झाल्‍यानंतर पावसाने दडी मारली होती. यामुळे बळीराजाला दुबार पेरणी करावी लागली होती. ती देखील जेमतेम उगल्‍यानंतर मागील दीड महिन्‍यांपासून पावसाने दडी मारली होती. यामुळे बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागून होत्‍या.

जिल्‍ह्यातील अनेक भागात दमदार

जळगाव शहरासह जिल्ह्यातील भुसावळ, पारोळा, अमळनेर, भडगावसह विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली. तब्बल महिन्यापासून पाऊस गायब होता. श्रावण सुरू होऊनही पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र आजच्या पावसाने पिकांना जिवदान मिळाले आहे. पिकांचे उत्पादन कमी होणार असले तरी या पावसाने दिलासादायक चित्र जिल्ह्यात आहे.

दीड दिवसात ५० मीमी पाऊस

जळगाव जिल्‍ह्यात सोमवारी सायंकाळपासून पावसाला सुरवात झाली. सोमवारी काही भागात तुरळक स्‍वरूपात पाऊस झाला. मात्र मंगळवारी सकाळपासूनच पाऊस सुरू होता. रात्रीसाडेआठच्‍या सुमारास जळगाव शहरासह भुसावळ, पारोळा, अमळनेर, धरणगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. तर आज सकाळी देखील जोरदार पावसाच्‍या सरी बरसल्‍या. यामुळे मागील दीड दिवसात जिल्‍ह्यात सरासरी ५० मीमी इतका पाऊस झाल्‍याची नोंद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

White vs Yellow Ghee : पांढरे की पिवळे तूप? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? रोज खाण्यापूर्वी जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Vastu Tips: महिन्याच्या शेवटी खिशात पैसा राहात नाही? आजच करा हे ५ सोपे उपाय; कधीही भासणार नाही पैशांची चणचण

SCROLL FOR NEXT