महाराष्ट्र

जळगाव जिल्‍ह्यात ऑगस्‍टच्‍या पहिल्‍या आठवड्यात मुसळधार पाऊस

जळगाव जिल्‍ह्यात ऑगस्‍टच्‍या पहिल्‍या आठवड्यात मुसळधार

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस हा कमी व काही भागातच पडला आहे. जुलै महिन्‍याचा अंतिम आठवडा सुरू असताना देखील अनेक भागांमध्‍ये पाऊस नसल्‍याने पेरणी होवू शकलेली नाही. मात्र ऑगस्टच्‍या पहिल्‍या आठवड्यात म्‍हणजे ३ ते ६ ऑगस्‍ट दरम्‍यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. (jalgaon-news-heavy-rain-alert-in-Meteorological-Department-on-jalgaon-district)

जुलै महिन्‍यात पाऊस कमीच

गेल्या पाच वर्षापासून जुलै महिन्यात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण वर्षानुवर्षे कमी कमी होत आहे. गेल्या पाच सहा वर्षाचा पावसाचे जुलै महिन्यातील गणित पाहता जुलै महिन्यात कमी पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. सॅटेलाईटद्वारे आकाशातील पावसाची स्थिती पाहिली असता येत्या ३१ जुलैपर्यंत पाऊस कधी कमी, कधी जास्त पडेल. मात्र तीन ते सहा ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाचा पडेल अंदाज आहे.

आतापर्यंत ५७ टक्‍केच पाऊस

जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून ते दहा जुलैपर्यंत पावसाने ओढ दिली होती. नंतर कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. जिल्हयात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाल्याचे महसूल विभाग सांगते. रोज आकाशात पावसाचे ढग गर्दी करतात, मात्र पाऊस पडत नाही. काही वेळातच आकाश स्वच्छ होते. याचा अर्थ पावसाच्या ढगांना गारहवा मिळत नाही. ती मिळण्यासाठी झाडांची गर्दी असणे आवश्‍यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT