Jalgaon Temperature Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Temperature : जळगाव जिल्ह्यात पुढील आठवड्यात उष्णतेची लाट; पारा पोहचला ४० अंशाच्या वर

Jalgaon News : राज्यात उन्हाची झळ मार्च महिन्याच्या सुरवातीपासूनच जनविण्यास सुरवात झाली आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील अनेक शहरातील तापमान ४० अंशाच्या वर पोहचले होते

Rajesh Sonwane

जळगाव : यंदाचा उन्हाळा तीव्र राहण्याची शक्यता यापूर्वीच वर्तविण्यात आली आहे. मध्यंतरी जळगावातील तापमान ४० अंशाच्या वर गेल्यानंतर वातावरणात पुन्हा बदल होऊन तापमान खाली घसरले होते. मात्र पुढील आठवड्यात जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविली जात आहे. या काळात पारा ४४ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. 

राज्यात उन्हाची झळ मार्च महिन्याच्या सुरवातीपासूनच जनविण्यास सुरवात झाली आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील अनेक शहरातील तापमान ४० अंशाच्या वर पोहचले होते. मात्र मागील दोन आठवड्यांपासून वातावरणात बदल होऊन तापमान खाली गेले होते. रात्री गारवा व दुपारी कडक उन्हाचे चटके असे वातावरण होते. यामुळे आतापर्यंत उष्णतेची फारशी झळ जाणवून आली नाही. मात्र पुढील आठवडा उन्हाचे चटके तीव्र होणार आहेत. 

पुढील आठवड्यात उष्णतेची लाट 

जळगाव जिल्ह्यात ३० मार्चपासून पुढील काही दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज आहे. या कालावधीत तापमान ४३ ते ४४ अंशांपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. हीट व्हेवचा हा काळ राहणार असल्याने नागरिकांनी उन्हापासून बचाव करावा; असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन विभागाही सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी सांगितले आहे.

असा करा बचाव
उन्हाच्या तीव्र झळा या काळात जाणविणार असल्याने शक्‍य असेल त्याचवेळी बाहेर पडावे. तसेच पुरेसे पाणी प्यावे, ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन वापरावे, लिंबू पाणी, ताक/लस्सी आणि फळांचा रस घ्यावा. पातळ, सैल, सुती व शक्‍यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे. घराबाहेर पडताना छत्री, टोपी, टॉवेल वापरा. उन्हात बाहेर जाताना शूज व चप्पल घाला. उन्हातून आल्यानंतर लागलीच पाणी पिऊ नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

मुंबई पोलीस दलात कोट्यवधींचा महाघोटाळा! थेट पोलिसांच्याच पगारावर मारला दरोडा; मुख्य सूत्रधार अखेर अटकेत

Maharashtra News Live Update: प्लास्टिकच्या कारखान्यात भीषण आग, आगीत काही कामगार अडकल्याची भीती

Gold Price Today: खुशखबर! सोनं झालं स्वस्त; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT