मनोज जयस्वाल
वाशीम : शेतातील गोंधनीच्या झाडावर फुलोरा तोडण्यासाठी गेला होता. फुलोरा तोडत असताना झाडाच्या जवळून गेलेल्या विद्युत तारांना स्पर्श होऊन विजेचा जोरदार झटका बसला. यात सदर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरची घटना वाशिमच्या रिसोड तालुक्यातील लोणी बुद्रुक परिसरात घडला आहे.
वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील गणेश वसंत इंगोले (वय ४५) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गणेश इंगोले हा गावा नजीकच असलेल्या गट नंबर १८१ मध्ये एका गोंधणीच्या झाडावर फुलोरा तोडण्यासाठी गेला होता. झाडावर चढला असताना फुलोरा तोडत होता. याच वेळी झाडाच्या वरून ११ केव्ही क्षमतेची विद्युत प्रवाह असलेली लाईन गेलेली असून हे तार त्याच्या नजरेस पडली नाही.
विद्युत तारेचा स्पर्श होताच खाली कोसळला
दरम्यान फुलोरा तोडण्यात जवळच असलेल्या विद्युत तारेला गणेश याच्या शरीराचा स्पर्श झाल्याने त्याला जोरदार झटका बसला. यामुळे तो झाडावरून खाली कोसळला यात त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना २५ मार्चला सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. सदर घटनेची माहिती गावात मिळाल्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी धावत आले होते.
तर वाचला असता जीव
ज्या गोंधणीच्या झाडावर सदर मृतक इसम तोडण्यासाठी गेला होता. त्या गोडनीच्या झाडांमध्ये अकरा केवी विद्युत तारा झाडांच्या फांद्यामधून गेल्या होत्या. सदर घटनाही विद्युत वितरण कंपनीच्या अकार्यक्षमपणामुळे झालेली आहे. वितरण कंपनीने वेळीच विद्युत प्रवाह वाहून जाणाऱ्या येणाऱ्या तारांच्यामध्ये येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडल्या असत्या तर आजची घटना घडली नसती; असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.