Malegaon Crime : तोतया जिल्हाधिकाऱ्याला अटक; मालेगावमध्ये नाव बदलून वास्तव्य, नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा

malegaon News : मालेगावमध्ये मागील काही दिवसांपासून वास्तव्यास होता. नागरिकांशी संपर्क वाढवत त्याने नाशिकच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती होणार. तसेच नाशिक विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्याची बतावणी केली
Malegaon Crime
Malegaon CrimeSaam tv
Published On

अजय सोनवणे 
मालेगाव (नाशिक)
: नाशिकच्या मालेगावमध्ये नोकरी तसेच सरकारी जागेवर घरे बांधून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या तोतया जिल्हाधिकाऱ्याला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. विशेष म्हणजे मुस्लिम नाव धारण करून तो मालेगावमध्ये मागील काही दिवसांपासून वास्तव करीत होता. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरु आहे. 

रिंकल नरेश रजक उर्फ अब्दुल रहेमान असे अटक करण्यात आलेल्या तोतया जिल्हाधिकाऱ्याचे नाव आहे. रिंकल हा मालेगावमध्ये मागील काही दिवसांपासून वास्तव्यास होता. येथील नागरिकांशी संपर्क वाढवत त्याने आपली नाशिकच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती होणार आहे. तसेच नाशिक विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्याची बतावणी केली. वरचा अधिकारी असल्याचे सांगितल्याने त्याच्या सांगण्यावर नागरिकांनी विश्वास ठेवला.  

Malegaon Crime
Water Shortage : पंधरा दिवसांपासून गावात पाणीपुरवठा नाही; संतप्त ग्रामस्थांनी सरपंचासह ग्रामसेवकाला ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले

घर व नोकरी देण्याचे आमिष 

विश्वास संपादन करत रिंकल याने मालेगावच्या जाफर नगर भागात सरकारी जागा ९९ वर्षाच्या करारावर घेऊन त्या ठिकाणी वसाहत बांधण्यात येत आहे. याठिकाणी बांधण्यात येत असलेल्या वसाहतमध्ये घरकुल नावावर करण्यासाठी तसेच नोकरी लावून देण्याचे आमिष त्याने दाखविले. यासाठी त्याने अनेकांकडून पैशांची मागणी करत लाखो रुपयांना गंडा घातल्याचा त्याच्यावर आरोप आहे.  

Malegaon Crime
Jal Jeevan Mission : जलजीवनचा बट्ट्याबोळ; पाणी योजना अपूर्णच, पाण्यासाठी नागरिकांची वणवण

अटक करत रोख रकमेसह कार जप्त 

दरम्यान रिंकल याने दिलेला शब्द पूर्ण होत नसल्याने त्याच्यावर संशय आला. यामुळे काहींनी पोलिसात तक्रारी दाखल केल्या होत्या. याचा तपास करत पोलिसांनी त्यास अटक करून त्याच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याच्याकडून लाखो रुपयांची रोकड व महागडी कार हस्तगत केल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिस त्याची सखोल चौकशी करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com