Jalgaon Tempreture Heat Stroke Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Heat Stroke News: तरुणाचा उष्माघाताने मृत्यू; परिवाराचा मन हेलावणारा आक्रोश

Jalgaon HeatWave News: तरुणाचा उष्माघाताने मृत्यू; परिवाराचा मन हेलावणारा आक्रोश

साम टिव्ही ब्युरो

कजगाव (जळगाव) : जिल्‍ह्यातील तापमानाचा पारा या आठवड्यात अधिक (Heat Wave) वाढला आहे. यामुळे अनेकांना त्रास होत असून उष्माघाताने देखील काहींचा मृत्‍यू झाला आहे. यात कजगाव (Chalisgaon) येथील तरुण अक्षय रत्नाकर सोनार (वय २९) याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. (Maharashtra News)

वाढत्या तापमानामुळे शनिवारी (ता.१३) संध्याकाळी अक्षय सोनार याला अस्वस्थ वाटू लागले. यानंतर चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. नेहमी हसतमुख असलेला अक्षय हा सुवर्णकार समाजाचे माजी अध्यक्ष रत्नाकर सोनार यांचा थोरला मुलगा होता.

अक्षयच्‍या मागे दीड वर्षाचा मुलगा, पत्नी, आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. अक्षयचा दीड वर्षीय मुलगा आपल्या वडिलांना आर्त हाक देत होता. मृताच्या पत्नी, आई, वडील, व भावांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता. दरम्यान अक्षयला श्रद्धांजली म्हणून सुवर्णकार समाज बांधवांनी तसेच संपूर्ण सराफ बाजारातील व्यावसायिकांनी आपली आस्थापने बंद ठेवली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamir Khan : आमिर खानचे विवाहबाह्य संबंध; लग्न न करता मुलगा, भावाच्या आरोपाने खळबळ, कोण आहे जेसिका हाइन्स?

मुंबईची तुंबई! मिठी नदी धोक्याच्या पातळीवर, बीकेसीतह पाणीच पाणी; मुंबईकरांची दाणादाण

Mumbai Rain Video : पावसामुळे मुंबईची तुंबई! गांधी मार्केटमध्ये गुडघाभर पाणी, नागरिकांची ताराबंळ, व्हिडिओ पाहा

Sambhajinagar : पाण्याच्या प्रवाहात नदीत मधोमध अडकली कार; भाविकांचा जीव टांगणीला, सुखरूप बाहेर काढण्यात यश

Coolie VS War 2: सोमवारी 'कुली'ने मारली बाजी, केली २०० कोटी कल्बमध्ये एन्ट्री; जाणून घ्या 'वॉर २'चं कलेक्शन

SCROLL FOR NEXT