Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : हृदयद्रावक..पतीला त्रास होत असल्याने रुग्णालयात नेले; पत्नीचाच हृदयविकाराने मृत्यू

Rajesh Sonwane

जळगाव : पतीला रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याने पत्नीने त्यांना तपासण्यासाठी रुग्णालयात नेले. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच पत्नीला त्रास जाणवू लागला. यात त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. पती- पत्नी दोन्ही जण जळगावात अधिकारी आहेत. सदरची घटना एकूण जिल्हा परिषदेतील अधिकारीना धक्काच बसला.   

जळगाव (Jalgaon) जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागात जिल्हा कार्यक्रम अधिकारी या पदावर कार्यरत असलेले देवेंद्र राऊत यांच्या पत्नी तथा जिल्हा महिला बालकल्याण विभागात अधिकारी असलेल्या मयूरी करपे- राऊत यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. जळगाव शहरातील दादावाडी परिसरातील श्रीराम नगर या भागात वास्तव्यास होते. दरम्यान शनिवारी पती देवेंद्र राऊत यांना हृदयविकाराचा (Heart Attack) त्रास जाणवू लागल्याने त्या पतीला घेऊन रुग्णालयात घेऊन गेल्या होत्या. देवेंद्र राऊत यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच अचानक मयूरी करपे यांना चक्कर येऊन प्रकृती खराब झाल्याने त्या जमिनीवर कोसळल्या. 

त्यानंतर रुग्णालयात असलेलय नातेवाइकांनी पती-पत्नीला दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात तातडीने हलविले. त्या ठिकाणी देवेंद्र राऊत यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर मयूरी करपे-राऊत यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या वेळी नातेवाइकांना अश्रू अनावर झाले होते. तर श्रीरामनगरात माहिती मिळताच परिसरातील रहिवासी नातेवाइकांसह जिल्‍हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली. घडला प्रकार ऐकून अनेकांना धक्का बसला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : तिसऱ्या आघाडीवर शिक्कामोर्तब; बघा काय म्हणाले बच्चू कडू

Ahmednagar Firing Case : कोपरगावात भरदिवसा गोळीबार, VIDEO

Bachelor Party Destination : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय? 'या' ठिकाणी प्लान करा बॅचलर पार्टी

Congress Protest: राहुल गांधींचा अपमान सहन करणार नाही, वाचाळवीरांना लगाम घाला; काँग्रेसचं आंदोलन, भाजपला इशारा

Maharashtra News Live Updates: मी निवडणूक लढण्यावर ठाम - माजी पोलीस आयुक्त संजय पांडे

SCROLL FOR NEXT