Gold Silver Price Today
Gold Silver Price Today Saam tv
महाराष्ट्र

Gold Silver Price Today: एकाच दिवसात सोने सहाशे, चांदी पंधराशे वधारली

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : तुलसीविवाह झाल्यानंतर सुरु होत असलेल्या लग्नसराईमुळे सोने, चांदीच्या दरात आतापासूनच वाढ होवू लागली आहे. एकाच दिवसात सोन्याच्या दरात (Gold Price Today) सहाशे (एक ग्रॅम) तर चांदीच्या (Silver) दरात किलोमागे दीड हजारांची (जीएसटी विना) वाढ झाली आहे. (Live Marathi News)

दिवाळी (Diwali) सण धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. धनत्रयोदशीपासून सोने खरेदी वेगात सुरु झाली आहे. दिवाळीच्या काळात २२ ते २७ नोव्हेंबर दरम्यान सूर्यग्रहणाचा दिवस वगळता इतर दिवशी सोने, चांदीचे दागिने खरेदीस ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा व भाऊबीजला सोन्याची प्रचंड विक्री झाली.

धनत्रयोदशीला सोन्या-चांदीचा जो दर होता (सोन्याचा दर प्रतितोळा ५१ हजार, तर चांदीचा प्रतिकिलो ५९ हजार होता). तोच दर पाडवा, भाऊबीजेपर्यंत नंतर २८ ऑक्टोबरपर्यंत कायम होता. त्यानंतर २९ ऑक्टोबरला सोन्याच्या दरात दोनशे तर चांदीच्या दरात पाचशेची घट झाली होती. आज सोन्याच्या दरात ६०० ची वाढ तर चांदीत १५०० रुपयांची वाढ झाली. मात्र सोने प्रती तोळा ५१ हजार ४०० तर चांदी ६१ हजारांवर (जीएसटी विना) पोचली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anti Diet Plan म्हणजे काय? कोणासाठी आहे फायदेशीर

Special Report | शिंदेंना भाजपचा मुख्यमंत्री म्हणून विरोध! राऊतांच्या दाव्याने राजकीय भूकंप येणार?

Special Report | पाकिस्तानचा घर जाळून कोळशाचा व्यापार! सरकारी कंपन्या विकणार?

Special Report | दादा-ताई असा फरक कधीच केला नाही! पवार स्पष्टच बोलले..

Akola News: अकोल्यात एकाच दिवसात 3 मोठे अपघात, 5 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT