अहमदनगर : सत्तेसाठी भाजप वाट्टेल त्या तडजोडी करत असल्याच्या शरद पवारांच्या (Sharad Pawar) वक्तव्यावर बोलताना महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकार यावे; यासाठी त्यांनी काय काय तडजोडी केल्यात हे पवार साहेब विसरले आहेत; असा टोला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे. (Tajya Batmya)
दुरान्वये ज्यांचा तत्वाशी संबंध नव्हता. त्यावेळी सत्ते करता आपण काय केले आणि आज आम्ही काय चित्र पाहतो. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला सर्वांनीच पाठ फिरवली. काँग्रेस (Congress) म्हणते शिवसेना (Shiv Sena) आमचा नैसर्गिक मित्र नाही. सत्ता गेली की सगळी तत्व गुंडाळून ठेवली. पंतप्रधान मोदींवर टीका करण्याआधी त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील म्हणाले.
राष्ट्रवादीचे बेरीज चुकली
राष्ट्रवादी पक्षाचे 2 दिवसीय मंथन शिबिर नुकतेच शिर्डी येथे पार पडले. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी विधान सभेची मिशन 100 चा नारा दिला आहे. त्यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी टीका केली. मला वाटते त्यांची कुठे तरी बेरीज चुकली असली पाहिजे. प्रत्येक पक्षाने आपल मिशन सांगितल आहे. परंतु मागच्या तीन चार निवडणुकांमध्ये त्यांचे मिशन चाळीसपर्यंत थांबले आहे. ते 40 एक कमी होऊ नये एवढी काळजी घेण्याची गरज असल्याचे टोला विखे यांनी लगावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.